Home /News /maharashtra /

'असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का?' सेनेच्या मंत्र्याने अधिकाऱ्यांना झापले, VIDEO

'असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का?' सेनेच्या मंत्र्याने अधिकाऱ्यांना झापले, VIDEO

'फुकटचा पगार घेता का? असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का? दलालाकडून पैसे मिळाले तर तुम्ही खूष असतात'

औरंगाबाद, 15 फेब्रुवारी : 'सरकारी काम आणि तीन महिने थांब' असं नेहमी म्हटलं जाते. त्यामुळेच  अधिकाऱ्यांच्या बाबूगिरीचा प्रताप पाहून शिवसेनेचे मंत्री आणि राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी भर सभेत अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील विविध विकास योजनांचा आढावा घेण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी बैठक बोलावली होती. यावेळी अधिकाऱ्यांकडून घरकुल योजनेतील लाभार्थ्यांची थातूरमातूर यादी पाहून त्यांनी संबंधित अधिकाऱ्याला धारेवर धरले. 'फुकटचा पगार घेता का? असे काम तुमच्या बापाने कधी केले होते का? दलालाकडून पैसे मिळाले तर तुम्ही खूष असतात, जेव्हा सर्वसामान्य माणसाचे काम असते तेव्हा कुठे असता, अशी यादी तयार केली जाते का, महाराष्ट्र कुठे आहे हे तरी माहिती आहे का? एखादा राक्षसाची अवलाद सुद्धा अशी वागणार नाही, त्या गरिबांना न्याय देण्याची भूमिका पाहिजे, गरिबांना घरकूल दिले पाहिजे, अशी शब्दांत सत्तार यांनी अधिकाऱ्यांनी कानउघडणी केली. ज्या जनतेनं आपल्याला निवडून दिले त्याचे काम करणे हे आपले कर्तव्य आहे. सरकारी योजना या त्यांच्यासाठीच आहे. सर्वसामान्य नागरिक हे आमचे मालक आहे, ते आमचा कान धरू शकता, जर एक रुपयांचा पैसा खाल्ला तर माझ्या इतका वाईट कुणीही नाही? असा इशाराही सत्तार यांनी दिला. यावेळी अब्दुल सत्तार यांचा पारा चांगलाच वाढल्याचा पाहायला मिळाला. अब्दुल सत्तार यांनी अधिकाऱ्यांना झापल्यानंतर बैठकीला उपस्थित नागरिकांनी टाळ्या वाजवल्या.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या