मुंबई, 23 नोव्हेंबर : 'रावसाहेब दानवे (raosaheb danve)हे दानव असून मला निवडणुकीत त्यांनी त्रास दिला आहे. त्यामुळे जोपर्यंत त्यांचा पराभव होत नाही, तोपर्यंत डोक्यावरील टोपी काढणार नाही', असा संकल्प शिवसेनेचे (Shivsena) नेते आणि राज्यमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी बोलून दाखवला.
श्रीरामपुर येथे पंचायत समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन अब्दुल सत्तार यांच्या हस्ते रविवारी पार पडले. यावेळी भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील सुद्धा हजर होते. यावेळी, डोक्यात टोपी का कायम असते, याबद्दल सत्तार यांनी पहिल्यांदाच खुलासा केला.
'रावसाहेब दानवे यांचा पराभव जोपर्यंत होणार नाही, तोपर्यंत टोपी काढणार नाही, असा संकल्प केला होता. पण, काही दिवसांनी परिस्थिती उलटी झाली. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रावसाहेब दानवे निवडून आले पाहिजे, असं सांगितलं आणि टोपीचा मुक्काम आणखी वाढला. मी काही टोप्या घालण्याचे काम करत नाही, त्यामुळे टोपीचा मुक्काम पाच वर्ष वाढला आहे', असं सांगताच सभागृहात एकच हशा पिकली.
सावधान! या चुका केल्यात तर SIM मुळे रिकामं होऊ शकतं तुमचं बँक खातं
'आता ज्यांच्या विरोधात टोपी घातली. त्यांच्या प्रचाराच काम करावे लागले. त्यावेळी दिल्लीतील मोठ्या नेत्याने आम्हाला बोलावून घेतले होते आणि त्यांनी दानवे यांच्या प्रचाराबद्दल सांगितले. पण, मी त्यांना सांगितले, हा माणूस जो आहे तो चकवा आहे, तो काय आमच्या मागे लागला तर पाठलाग काही सोडणार नाही. आज यांना निवडून दिले तर उद्या ते आमच्यामागे कोयता घेऊन मागे लागतील, ते दानवे नाही दानव आहे. मी त्यांना माझ्या मतदारसंघात 1 लाखांची लीड दिली. पण, शेवटी जे करायचे तेच दानवेंनी केलं. अर्जुन खोतकर यांच्या मागे लागून बळी घेतला, असा किस्साही सत्तार यांनी सांगितले.
दरम्यान, अब्दुल सत्तार यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेची ऑफर दिली. विखे पाटील यांना शिवसेनेत येण्याचं आवाहन केल्याचं अब्दुल सत्तार यांनी खुद्द सांगितलं. 'राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेनेत यावं, विखे पाटील राज्याचे अनुभवी नेतृत्त्व आहे. विखे पाटलांच्या नेतृत्त्वाची राज्याला गरज आहे', असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं.
5 वर्षांपूर्वी लॅपटॉपमध्ये घेतला मित्राच्या मोबाइलचा बॅकअप; पोलिसांकडे रवानगी
तर 'अब्दुल सत्तार आणि माझी मैत्री पक्ष विरहीत आहे. पंचायत समितीच्या कार्यक्रमासाठी अब्दुल सत्तार यांना आमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, आमची कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही, ही राजकीय भेट नव्हती, असंही विखे पाटील यांनी स्पष्ट केले.