शिवसेनेसाठी वर्धापनदिनीच 'गुड न्यूज', मुख्यमंत्री फडणवीस देणार गिफ्ट?

शिवसेनेसाठी वर्धापनदिनीच 'गुड न्यूज', मुख्यमंत्री फडणवीस देणार गिफ्ट?

विधानपरिषदेचं उपसभापती पद हे रिक्त असून या पदावर निवडणूक व्हावी यासाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही आहे.

  • Share this:

मुंबई, 19 जून : विधानपरिषद उपसभापतीपदासाठी निवडणूक होण्याची शक्यता आहे. सध्या उपसभापती पद हे रिक्त असून या पदावर निवडणूक व्हावी यासाठी भाजपा आणि शिवसेना आग्रही आहे. ही निवडणूक झाल्यास युतीकडून उपसभापतीपद शिवसेनेला देण्यात येण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचा आज 53 वा वर्धापनदिन आहे. मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात संध्याकाळी 6 वाजता या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील शिवसैनिकांना मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. शिवसेनेच्या वर्धापन दिनाला पहिल्यांदाच इतर पक्षातील नेत्यांना निमंत्रित करण्यात आलं आहे.

विधानपरिषदेत सभापतीपदाबाबतही हालचालींना वेग

राष्ट्रवादीचे नेते आणि विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर शिवसेनेत जाण्याच्या चर्चा रंगत आहेत. पण अशातच रामराजेंना धक्का बसला आहे. कारण भाजपकडून रामराजे यांच्याविरोधात विधानपरिषदेत अविश्वास ठराव आणला जाण्याची शक्यता आहे.

राज्य सरकारकडून विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात बजेट सादर करण्यात आलं. यावेळी अर्थसंकल्प फुटला असल्याचा आरोप करत विरोधकांनी गोंधळ घातला. यात विधानपरिषदेत रामराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांत दुजाभाव केल्याचा आरोप भाजप नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून करण्यात आला. तसंच रामराजेंविरोधात अविश्वास ठराव आणण्याबाबतही भाष्य केलं.

भाजपने अविश्वास ठराव मांडल्यास रामराजे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण स्थानिक स्वराज्या संस्थांतील पराभवानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीचं संख्याबळ घटलं आहे. अशावेळी रामराजे यांना विधानपरिषद सभापती म्हणून आपलं पद कायम राखणं कठीण होऊ शकतं.

VIDEO : खडसेंची एण्ट्री झाली अन् अजित पवारांसह विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना लगावला टोला

First published: June 19, 2019, 1:51 PM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading