CAA च्या समर्थनार्थ पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते रस्त्यावर!

CAA च्या समर्थनार्थ पुन्हा एकदा शिवसेनेचे नेते रस्त्यावर!

  • Share this:

कन्हैया खंडेलवाल, प्रतिनिधी

हिंगोली, 30 डिसेंबर : केंद्र सरकारने सीएए अर्था नागरिकत्त्व सुधारणा कायदा लागू केल्यानंतर सीएएच्या समर्थनार्थ आणि विरोधात मोर्चे निघत आहेत. हिंगोली जिल्ह्यातील वसमत इथं सीएएच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकांनी सहभाग घेतला. या समर्थनार्थ काढलेल्या मोर्चात वसमत नगरपालिकेचे शिवसेना नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार आपल्या समर्थकांसह सहभागी झाले होते.

पुन्हा एकदा हिंगोली जिल्ह्यातील शिवसेना लोकप्रतिनिधीने  CAA कायद्याला समर्थन दिल्याने चर्चा रंगत आहे. शिवसेना उघडपणे कोणत्याही आंदोलनात सीएएच्या समर्थनार्थ उतरली नाही. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी मात्र, या कायद्याला समर्थन करताना दिसत आहे. विशेष म्हणजे, लोकसभेत सेनेनं या कायद्याच्या बाजूने मतदान केलं होतं पण त्यांच्या या भूमिकेनंतर काँग्रेसने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर राज्यसभेत विधेयकाच्या मतदानाच्या वेळी सेनेच्या खासदारांनी सभात्याग केला होता.  या कायद्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही राज्यातील जनतेच्या हक्कासाठी सरकार समर्थ आहे, अशी भूमिका मांडली होती.

पण शहरात पक्षादेश नसतानाही शिवसेना खासदार आणि आमदार यांनी यापूर्वी सीएए समर्थनार्थ निघाले मोर्चाला समर्थन केल्याचं बोललं जात होतं. मात्र, वाद चिघळत असल्यामुळे दोघांनी या प्रकरणी माघार घेतली होती.

आता वसमतचे नगराध्यक्ष श्रीनिवास पोरजवार यांनी सीएए कायद्याला समर्थन दिलं आहे. पोरजवार यांनी सीएएला समर्थन दिल्याचा वाद जर चिघळला तर त्यांची भूमिका काय असणार आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

नागरिकत्त्व सुधारणा कायद्यावरून शिवसेना खासदाराचे यू-टर्न?

याआधीही हिंगोली आणि औंढा नागनाथ येथे नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ नागरिकांनी मोर्चा काढला होता. या मोर्चाला सेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी समर्थन दिलं होतं. एवढंच नाहीतर सेनेचे आमदार

संतोष बांगर हे स्वतः हजर होते. खासदार हेमंत पाटील यांचा पत्र आणि संतोष बांगर यांची मोर्चाला उपस्थिती असल्याची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती. परंतु, या पत्रावरून हेमंत पाटील यांनी यू-टर्न घेतलं आहे.

'मी कामानिमित्त मुंबईत असल्यामुळे मोर्चाला हजर नव्हतो. माझं या कायद्याला समर्थन असल्याचं पत्र हिंगोली जिल्हाधिकाऱ्यांना माझ्या सहीने देण्यात आलं होतं, पण हे पत्र खोटे आहे', असा दावा पाटील यांनी केला.

हेमंत पाटील यांनी हिंगोली शहर पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रारही दिली. या तक्रारीत हेमंत पाटील यांचे कथीत पत्र बनावट असून असे कोणतेच पत्र दिलं नसल्याचं तक्रारीत नमूद केले आहे.

NRC  व CAA च्या विरोधात अमरावतीमध्ये मोर्चा

दरम्यान, NRC च्या विरोधात अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लिम आणि अन्य समुदाय रस्त्यावर येवून विधेयकाला विरोध दर्शविला. यामध्ये हजारोंच्या संख्येनं  मुस्लीम समुदाय रस्त्यावर उतरला होता. आम्ही NRC ला कधीही सपोर्ट करणार नाही. आम्ही कोणतेही पुरावे देणार नाही अशी शपथ घेतली.  यामध्ये जिल्ह्यातील 53 संघटनांनी सुद्धा पाठिंबा देत एनआरसीच्या विधेयकाला विरोध दर्शवत भाजप सरकार विरोधी घोषणा दिल्या.

'नरेंद्र मोदी-अमित शहा वापस जाओ', आम्ही या देशाचे नागरिक, आम्हाला या देशात राहायचं आहे', अशा घोषणा यावेळी या मोर्चातrल समुदयाने दिल्या. शेवटी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन मोर्चाची सांगता झाली. या मोर्चासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2019 05:35 PM IST

ताज्या बातम्या