Home /News /maharashtra /

शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

शिवसेना नेत्याच्या कारला भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार

माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ हा अपघात झाला. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिद्धनाथ दर्शनासाठी जात होते

    वीरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी पंढरपूर, 14 जानेवारी : सोलापूरचे माजी आमदार आणि शिवसेनेचे नेते दिलीप माने यांच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात एक दुचाकीस्वार ठार झाला आहे.  दिलीप माने आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहे. माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी गावाजवळ हा अपघात झाला. माजी आमदार दिलीप माने सहकुटुंब म्हसवडच्या सिद्धनाथ दर्शनासाठी जात होते. तेव्हा त्यांच्या इनोव्हा कारला अपघात झाला. कारवरील नियंत्रण सुटल्यामुळे समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला धडक दिली. हा अपघात इतक भीषण होता की, कारच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला. तर दुचाकीस्वार हा दूरपर्यंत फेकला गेला. या अपघातात दुचाकीस्वार शहाजी राऊत यांचा मृत्यू झाला. तर दिलीप माने आणि त्यांचे कुटुंबीय सुखरूप आहे. दरम्यान, पंढरपूर-मोहोळ मार्गावर सलग दुसऱ्या दिवशी भीषण अपघात झाला आहे. इश्वरवठार फाट्याजवळ मंगळवारी मध्यरात्री हा अपघात घडला. स्विफ्ट कार आणि पिकअपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात सांगोल्याचा युवक जागीच ठार झाला, तर अन्य चार जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सांगोल्यात एक युवक आपल्या मित्रांसह स्विफ्ट कारने प्रवास करत होता. मात्र पंढरपूर-मोहळ मार्गावर त्यांची कार पिकअपला धडकली. ही धडक इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. त्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अपघातग्रस्त वाहनातून जखमींना बाहेर काढलं. मात्र तोपर्यंत अपघातातील एकाने आपला प्राण सोडला होता. तर इतर 4 जण सध्या गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर सोमवारी पंढरपुरातील प्रसिद्ध उद्योजक महालक्ष्मी फर्निचरचे मालक सागर दोशी यांचे अपघातात (Accident) निधन झाले. कामानिमित्त मित्रांसोबत बाहेरगावी गेलेल्या सागर दोषी यांचा घरी परतत असताना अपघात झाला. गाडीवरील ताबा सुटल्याने त्यांची फॉर्च्युनर गाडी पलटली. या भीषण अपघातात सागर दोषी यांच्या जागेवरीच मृत्यू झाला.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Accident, Pandharpur, Pandharpur news, Shivsena

    पुढील बातम्या