'आमचंही ठरलंय; शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही'

कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही, असा ठाम निर्धार राज्याचे जलसंधारण मंत्री तथा शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. तसेच मंगळवेढा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी आमदार भारत भालके यांच्यावर जहरी टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 3, 2019 10:28 PM IST

'आमचंही ठरलंय; शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही'

विरेंद्रसिंह उत्पात (प्रतिनिधी)

माढा, 3 ऑगस्ट- कोणत्याही परिस्थितीत शिवसेना सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही, असा ठाम निर्धार राज्याचे जलसंधारण मंत्री तथा शिवसेना उपनेते तानाजी सावंत यांनी व्यक्त केला. तसेच मंगळवेढा येथे शेतकरी मेळाव्यात बोलताना तानाजी सावंत यांनी आमदार भारत भालके यांच्यावर जहरी टीका केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवेढा येथे शिवसेनेच्यावतीने शेतकरी मेळावा आणि तानाजी सावंत यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सावंत बोलत होते. यावेळी उस्मानाबादचे खासदार ओमराजे निंबाळकर, सेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, गणेश वानकर, सेनेच्या महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख शैला गोडसे उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना सावंत म्हणाले की, कुणी म्हणेल मी अमुक ह्याच्या जवळचा आहे, मी तमुक ह्याच्या जवळचा आहे, कुणी काहीही म्हणू दे, शिवसेना 1995 ते 2000 साली लढवलेल्या सोलापूर जिल्ह्यातील एकही जागा सोडणार नाही नसल्याचे सांगत आमचंही ठरलंय, अशा शब्दांत सावंत यांनी निर्धार बोलून दाखवला. यावरून आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेना सोलापूर जिह्यातील आपल्या वाटणीच्या सर्व जागा लढवणार असल्याचे मानले जात आहे. शिवसेना, भाजप महायुती झाल्यास जिल्ह्यातील विधासभा जागांचे फेरवाटप करताना शिवसेना तडजोड करणार नसल्याचे दिसून येत आहे.

तानाजी सावंत यांनी केले होते अजब वक्तव्य...

Loading...

दरम्यान, खेकड्यांच्या प्रादुर्भावामुळेच तिवरे धरण फुटले, असा जावाईशोध मंत्री तानाजी सावंत यांनी लावला. या आधी पुण्यातील मुठा कालवा फुटल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उंदीर, घुशी आणि खेकड्यांमुळे कालवा फुटल्याचे अजब तर्क लावला होता. तानाजी सावंत सोलापुरात बोलत होते, तानाजी सावंत, युवासेना नेते आदित्या ठाकरे जलसंपदा विभागाच्या आष्टी उपसासिंचन योजनेच्या उद्घाटनाला उपस्थित होते. या वेळी सावंत यांनी हे अजब वक्तव्य केले. तिवरे धरण फुटले, त्याला कोण जबाबदार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

VIDEO - ... म्हणून मुंबईला आली 26 जुलैची आठवण, मिठीने ओलांडली धोक्याची पातळी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 3, 2019 09:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...