मुंबई, 07 मे: शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी पुन्हा एकदा भाजप नेत्यांवर (BJP leaders) निशाणा साधला आहे. आज वाढलेल्या महागाईवर कुणीही बोलत नाही, पण भोंग्यावरच सगळे बोलत आहेत. सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचं पालन राज्यात होतं असल्याची टीका संजय राऊतांनी (Sanjay Raut) भाजपवर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून (Prime Minister Narendra Modi) भाजपचा एकही नेता सर्वसामान्यांच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. एकानंही आतापर्यंत सिलेंडरवर भाष्य केलेलं नाही, असा टोलाही संजय राऊतांनी केंद्राला लगावला आहे. महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा (loudspeaker issue) मुद्दाच नसल्याचं राऊतांनी म्हटलं आहे.
महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा मुद्दा उठलाच नाही, माहौल खराब करण्याचा प्रयत्न काही जणांनी केला, पण त्यांना यश आलं नाही, असंही ते म्हणालेत. काही लोकांनी दंगली करण्याचा प्रयत्न केला. पण या राज्यात सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार काम होतं. त्यामुळे दंगली करणाऱ्या आणि हिंदु-मुस्लीम दंगे घडवणाऱ्यांना धडा मिळाला, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.
kisan e-KYC : पीएम किसान e-KYC अपडेट करण्याची तारीख वाढली ‘या’ तारखेपर्यंत करा अपडेट
पुढे संजय राऊत म्हणाले की, देशात खरा मुद्दा महागाईचा बनला आहे, पण त्यावर कोणीच बोलायला तयार नाही. पंतप्रधान मोदी युरोपात जाऊन रशिया आणि युक्रेनबद्दल भाष्य करतात. त्यांना या देशांची चिंता आहे. त्यासंदर्भात ते मध्यस्थी करत आहेत. यावर त्यांचे भक्तही वाह वा करत आहेत. पण देशातील जनता बेरोजगारी, महागाईने त्रस्त आहे. सिलेंडरच्या वाढलेल्या किंमतीबद्दल कोणीही बोलायला तयार नाही.
महागाई-बेरोजगारी हे देशातील खरे मुद्दे आहेत, पण यावर एकतरी भाजपचा मंत्री, नेता बोलतोय का? ते भोंग्यावर बोलत आहेत. सरकार म्हणून तुम्ही अन्न-वस्त्र निवारा यावर बोलणं गरजेचं आहे, भोंग्यांवर बोलणं गरजेचं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
तर देशाचे पंतप्रधान महागाईवर बोलत नाहीत, अर्थमंत्री महागाईवर बोलत नाही, ना महाराष्ट्रातील भाजचे एखादे मोठे नेते यावर बोलत आहेत. त्यांचे मुद्दे वेगळेच आहेत. पंजाबचे पोलीस काय करतात, महाराष्ट्राचे पोलीस काय करतात याकडे यांचं लक्ष आहे. युक्रेन-रशिया हे देश त्यांचं पाहून घेतील, तुम्ही महागाईवर आधी बोला, असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
तरुणांनो, Indian Army मध्ये भरती व्हायचंय? मग कोणत्या परीक्षा असतात IMP? इथे मिळेल पूर्ण माहिती
भोंग्यांसंदर्भात एक राष्ट्रीय धोरण तयार केले पाहिजे आणि ते संपूर्ण देशात लागू केले पाहिजे. मशिदीवरील भोंग्यांचा विषय ज्यांनी काढला, त्यांच्यामुळे याचा सर्वात मोठा फटका हिंदू मंदिरांना बसला आहे. भजन-कीर्तन करणाऱ्यांना बसला आहे. यामुळे या भूमिकेवर सर्वात जास्त नाराज कोण असेल तर तो हिंदू समाज असल्याचं ते म्हणाले. तसंच महाराष्ट्रातील सर्वकाही ठिकठाक आहे, काही जणांनी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण महाराष्ट्रातील सर्व जातीधर्मांच्या लोकांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे. त्यामुळे हे देशात चालणार नसल्याचं संजय राऊतांनी ठणकावून सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.