मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /''गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती...'', संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण

''गोपीनाथ मुंडे असते तर युती तुटली नसती...'', संजय राऊत यांच्या वक्तव्यानंतर राजकीय चर्चेला उधाण

Sanjay Raut File Photo

Sanjay Raut File Photo

शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या.

मुंबई, 12 डिसेंबर: आज भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे (late BJP leader Gopinath Munde) यांची जयंती आहे. गोपीनाथ मुंडे (Goprinath Munde) यांच्या जयंतीनिमित्त आज राज्यभरातून विविध नेते आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून त्यांना आदरांजली वाहिली जात आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनीही गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती, असं वक्तव्य रविवारी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलं.

हेही वाचा- ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक

भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त संजय राऊत यांनी मुंडे आणि पवार दोघांचंही कौतुक केले.

माध्यमांशी संवाद साधताना राऊत म्हणाले की, भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली.

संजय राऊत यांच्याकडून शरद पवार यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव

राऊत म्हणाले की, शरद पवार सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. कृषी, संरक्षण क्षेत्रात त्यांनी ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत.

हेही वाचा- गोपीनाथ मुंडेंच्या आठवणीनं धनंजय मुंडे झाले भावूक, ''अप्पा... काळीज जड होते''

पुढे संजय राऊत यांनी म्हटलं की, महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता. 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत.

First published:
top videos

    Tags: BJP, Sanjay Raut (Politician), Shivsena