बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रनौत हिचा (kangana ranaut) बंगला आणि कार्यालयावर मुंबई महापालिकनं अनधिकृत असल्याचा ठपका ठेऊन कारवाई केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टानं मुंबई पालिकेची कारवाई बेकायदा असल्याचं म्हणत महापालिकेचा जोरदार दणका दिला आहे. कार्यालयावरील तोडकाम प्रकरणाची कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती. शुक्रवारी हायकोर्टानं या याचिकेवर आपला निकाल दिला आहे. कंगना रणौतच्या बंगल्यावर केलेली महापालिकेची कारवाई मुंबई हायकोर्टाने अवैध ठरवली आहे. कंगना म्हणाली, तुम्ही खलनायक ठरला कंगनानं हायकोर्टाचे आभार मानत हा लोकशाहीचा विजय आहे, असं म्हणत स्वागत केलं आहे. आपल्या कार्यालयावर केलेल्या तोडकाम कारवाईच्या विरोधात कंगनाने पालिकेत याचिका दाखल केली होती. अखेर न्यायालयाने कंगनाच्या कार्यालयावरील कारवाई बेकायदेशीर असल्याचा ठपका ठेवला आहे. कंगना रनौतने ट्वीट करून मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. 'जेव्हा एखादी व्यक्ती सरकारच्या विरोधात उभी राहते आणि जिंकते तेव्हा तो विजय हा व्यक्तीचा नसून तो लोकशाहीचा विजय आहे. ज्यांनी मला धैर्य दिले त्या प्रत्येकाचे आभार आणि ज्यांनी माझ्या तुटलेल्या स्वप्नांचा उपहास केला त्यांचेही आभार' अशी प्रतिक्रिया कंगनाने दिली. तसंच, 'तुम्ही एक खलनायक म्हणून काम केले त्यामुळेच मी एक हिरो होऊ शकले', असा टोलाही कंगनाने ठाकरे सरकारला लगावला. कंगनाची सुद्धा कानउघडणी न्यायाधीश शाहरुख काथावाला व न्यायाधील रियाझ छागला यांनी कंगनाची सुद्धा कानउघडणी केली आहे. 'मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे, व्यक्तींविरोधात आक्षेपार्ह विधाने करणे, सरकारच्या विरोधात विधाने करणे या कंगनाच्या कृतीला हायकोर्ट मान्यता देत नाही. त्याच्याशी हायकोर्ट सहमत नाही. कंगनाने भविष्यात असे ट्विट करण्यापासून स्वतःला रोखावे' अशी शब्दांत हायकोर्टाने कंगनाला समज दिली आहे. हेही वाचा...सुप्रीम व हायकोर्टाला सुद्धा हे 'महाराष्ट्रद्रोही' ठरवणार का?, फडणवीसांचा सवाल 'कोणत्याही नागरिकाने बेजबाबदार वक्तव्ये केली तर त्याकडे सरकार व प्रशासनाने दुर्लक्ष करणेच सोईस्कर आहे. बेजबाबदार वक्तव्ये करून कितीही मूर्खपणा केला, ती वक्तव्ये कितीही त्रासदायक असली तरी सरकारी प्रशासने त्याविरोधात कायद्याच्या चौकटीबाहेर जाऊन व कु-हेतूने कारवाई करू शकत नाही, असंही हायकोर्टाने पालिकेला बजावले आहे. महापालिकेने बजावलेली नोटीस आणि त्यानंतर तोडकामाचा काढलेला आदेश दोन्ही हायकोर्टाने रद्दबातल केले आहे. तो बंगला राहण्यायोग्य होण्यासाठी महापालिकेला काम करून द्यावे लागेल, असे आदेशही हायकोर्टाने पालिकेला दिले आहे.The actress called Mumbai Police mafia & Mumbai PoK. Do parties which are excited over Court order agree with this? Indecent remarks about judges or Courts lead to contempt, is it not defamation when someone makes such remarks about Maharashtra/Mumbai?: Sanjay Raut, Shiv Sena https://t.co/Dkh3TOfyGp pic.twitter.com/Kj8E0apF3C
— ANI (@ANI) November 27, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Kangana ranaut, Maharashtra, Sanjay raut