Home /News /maharashtra /

आधी राणेंकडून शिवसेना सचिवांचा 'मातोश्री'मधील 'बॉय' असा उल्लेख, मिलिंद नार्वेकरांकडूनही खोचक उत्तर

आधी राणेंकडून शिवसेना सचिवांचा 'मातोश्री'मधील 'बॉय' असा उल्लेख, मिलिंद नार्वेकरांकडूनही खोचक उत्तर

नारायण राणे यांच्या टीकेला आता शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांनीदेखील प्रत्युत्तर दिलं आहे.

    मुंबई, 16 फेब्रुवारी : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या कालच्या पत्रकार परिषदेला उत्तर देण्यासाठी भाजप नेते नारायण राणे (Narayan Rane) यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी संजय राऊतांवर सडकून टीका केली. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत शिवसेनेचे एकनाथ शिंदे (Eknath Shinde), सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) उपस्थित नव्हते. याबाबत पत्रकारांनी राणेंना प्रश्न विचारला असता त्यांनी "मिलिंद नार्वेकर कोण? ते 'मातोश्री'मध्ये बॉयचं काम करायचे ते का?", असे उलट सवाल केले. त्यांच्या या खोचक प्रश्नांना मिलिंद नार्वेकर यांनीदेखील तितक्याच खोचक शब्दांमध्ये ट्विटरवर उत्तर दिलं आहे. मिलिंद नार्वेकर नेमकं काय म्हणाले? मिलिंद नार्वेकर यांनी त्यांच्या स्वत:च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर नारायण राणे यांना उद्देशून एक ट्विट केलं आहे. "बॉय का? अच्छा! स्वतःच्या मेडिकल कॉलेजसाठी साहेबांकडून परवानगी मिळावी म्हणून दिवसभरात सात वेळा फोन करुन विनंत्या केल्याचं विसरलात? वाजली का नाही तुमच्या मेमरीची घंटी?", असा सवाल करत नार्वेकरांनीदेखील नारायण राणे यांना टोला लगावला आहे. नारायण राणे नेमकं काय म्हणाले होते? "कोण ओ मिलिंद नार्वेकर? पूर्वी मातोश्रीमध्ये बॉयचं काम करायचे ते काय? हो, माझ्यासमोरची गोष्ट आहे ओ. मी पाहिलं आहे, बेल मारली की येस सर, काय आणू? असं म्हणणारा आता नेता बनला. काय अपग्रेडेशन स्पीड आहे ओ", अशा शब्दांत नारायण राणे यांनी खिल्ली उडवली होती. नारायण राणे यांचा संजय राऊतांवर निशाणा नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. "संजय राऊतांनी नेमके कुणावर आरोप करायला घेतले होते? पत्रकार परिषदेला राज्यभरातील शिवसेनेचे नेते, मंत्री येणार अशी जाहिरात होती. पण विभागप्रमुख, नेते, मंत्री नव्हते. नाशिकचे काही मोजके लोकं होती. पक्षप्रमुखही नव्हते. शिवसेनेसाठी पत्रकार परिषद घेतली ती स्वत: त्यांनी अडचणीत आहे म्हणून पत्रकार परिषद घेतली. एवढे दिवस सेना भवन आठवलं नाही. जसं काही शिवसेना प्रमुख आपणच झालोय अशा आवेशात ते बोलत होते. त्याच पत्रकार परिषदेत ते काय-काय शब्द उच्चारत होते. एक वृत्तपत्राच्या संपादकाने काय-काय शब्द वापरले. मी तसे शब्द वापरु शकत नाही. पण फक्त एक शब्द वापरतो. आम्ही गांX नाही. अरे मी कुठे म्हणालो तसं? हा माणूस शिवसेनेत आला कधी? १० मे 1992 साली सामनात संपादक म्हणून आला. तो लोकप्रभामधून आला. त्याआधी मार्मिकमध्ये होता. तिथे हकालपट्टी झाली आणि लोकप्रभाला आला. लोकप्रभात असताना त्यांनी जे पराक्रम केले, त्यांनी त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंविरुद्ध अनेक लेख लिहिले. माझ्या हातात १० मे १९९२ सालीचा अंक आहे. यात त्यांनी बाळासाहेबांबद्दल लिहिलं आहे. त्यांनी लोकप्रभामध्ये छापलं आहे. माझ्याकडे लोकप्रभाचा अंक आहे." असं राणे म्हणाले. ('लाव रे तो व्हिडीओ' म्हणत शिवसेनेनं केली नारायण राणेंची बोलती बंद!) "हा पत्रकार कसा आहे त्याबद्दल मी बोलू इच्छित नाही. सेनाअंतर्गत कलह असल्याबद्दल लिहिलं आहे. संजय राऊत अंतर्गत कशी आग लावता येईले ते पाहत असतो. म्हणून तुमच्यावर मी चिडतो. तुम्ही लाचार पत्रकार. पैशांचा जोर आहे, असं बाळासाहेब ठाकरे राऊत यांना उद्देशून म्हणाले. लोकप्रभात असताना राऊतांनी बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरेंवर टीका करायला सोडलं नव्हतं, असंही राणे म्हणाले. संजय राऊत पत्रकार नाही. त्यांची भाष त्या पात्रतेची नाहीच. तुम्ही आरोप करा. बेकार आरोप करता. पण तुम्ही केव्हापासून आरोप करायला लागलात? ते काल अस्वस्थ का झाले? काल त्यांचा थयथयाट का झाला? प्रविण राऊतने ईडीला दिलेल्या जबाबानंतर थयथयाट चालू झाला. प्रविण राऊतच्या ईडी मुलाखतीनंतर नेमकं काय झालं? पत्रकार आहेस ना तर पुरावे देना. नाहीतर आम्ही सांगतो, तू अलिबागला जमीन घेतली. सुदिप पाटकर कोण? त्याच्या कंपनीत तुझ्या मुली डायरेक्टर कशा असू शकतात? तू दुसऱ्यांचं काढतो ना? स्वत:बद्दल बोलतो, असं म्हणत राणे राऊतांवर जोरदार बरसले. संजय राऊत शिवसेना वाढवत नाही. तर त्यांचं लक्ष उद्धव ठाकरे जिथे बसले आहेत तिथे आहे. ते शिवसेनेचे नाही तर कदाचित राष्ट्रवादीचा नाही तर पूर्ण राष्ट्रवादीचा आहे. त्यांना सुपारी मिळाली आहे, यांना हटव तुलाच मेन करतो आम्ही. कारण उद्धव ठाकरे, जेव्हा पहिल्यावेळी शरद पवार गेले तेव्हा त्यांच्याबरोबर फक्त संजय राऊत आणि आदित्य ठाकरे होते. त्यांची पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे. पूर्ण कुंडली आमच्याकडे आहे. तुझ्या मुख्यमंत्र्यांच्या पूर्ण व्यवहाराबद्दल संपूर्ण मला माहिती आहे. आम्ही का गप्प बसलो आहे. पण तू थेट 300 कोटी घेतले असे वक्तव्य करतो. ईडी अधिकाऱ्यांनी गप्प बसू नये. पुजा करावी आणि चौकशी करावी." असंही राणे म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या