मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'पोलीस उपाधीक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली', शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाचे गंभीर आरोप

'पोलीस उपाधीक्षकांनी शिवसेनेला बदनाम करण्याची सुपारी घेतली', शिवसेनेच्या माजी जिल्हा प्रमुखाचे गंभीर आरोप

केज पोलीस ठाणे हद्दीत आढळलेल्या गुटखा प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणानंतर शिवसेनेकडून (Shiv Sena) त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आलीय.

बीड, 25 नोव्हेंबर : पोलीस उपाधीक्षकांनी (Deputy Superintendent of Police) शिवसेनेला (Shiv Sena) बदनाम करण्याची सुपारी घेतली असल्याचा आरोप गुटखा प्रकरणात दोषी असलेले बीडचे शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे (Kundlik Khande) यांनी केला आहे. आरोप कोर्टात सिद्ध झाल्यास मी राजकारणातून संन्यास घेईल. कोणत्याही व्यासपीठावर येणार नाही, असं देखील खांडे यांनी म्हटलं आहे. गुटखा प्रकरणात (Gutkha Case) दोषी असलेले बीडमधील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली.

'न्यायालयाने आपल्याला कायमस्वरुपी क्लिनचीट दिलीय'

केज पोलीस ठाणे हद्दीत आढळलेल्या गुटखा प्रकरणात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय. या प्रकरणानंतर शिवसेनेकडून त्यांच्या पदाला स्थगिती देण्यात आलीय. मात्र खांडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. न्यायालयाने आपल्याला कायमस्वरुपी क्लिनचीट दिली असल्याचा दावा त्यांनी केला. दुसरीकडे जिल्हाप्रमुख पदासाठी जुन्या शिवसैनिकांनी लॉबिंग देखील सुरु केल्याच्या चर्चांना उधाणा आलं आहे. त्यामुळे आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार? हेच पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

हेही वाचा : रेकॉर्डवरील फरार आरोपी थेट अनिल देसाईंच्या स्वागताला, पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका?

नेमकं प्रकरण काय?

बीड जिल्ह्यात गुटख्याची तस्करी प्रकरणात अप्पर पोलीस अधीक्षक कुमावत यांनी काही दिवसांपूर्वी नांदूरघाट, इमारपूर आणि बीडमध्ये गुटख्याच्या गोदामावर छापे टाकले होते. यामध्ये तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हेच मुख्य आरोपी असल्याचे स्पष्ट झालं होतं. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल झाल्यानंतर जिल्हाप्रमुख खांडे फरार असल्याचं पोलीस रेकॉर्डवर आहे. या दरम्यान शिवसेनेचे सचिव, खासदार अनिल देसाई (Anil Desai) गेल्या आठवड्यात बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. त्यांच्या स्वागतासाठी पोलीस रेकॉर्डवर फरार असलेले खांडे कार्यक्रमात हजर राहीले होते. विशेष म्हणजे जाहीर कार्यक्रमात पोलिसांच्या समोर फरार आरोपी खांडे हजर होते. तरीही त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण चांगलंच चर्चेत आलं होतं. या प्रकरणाची राज्यभरात चर्चा झाल्यानंतर शिवसेनेच्या पक्षश्रेष्ठींनी खांडे यांच्या जिल्हाप्रमुखपदाला स्थगिती दिली होती.

हेही वाचा : Electric गाड्यांना किलोमीटरमागे एक रुपयाच खर्च, भारतात EV क्रांती होणार : नितीन गडकरी

"मला या प्रकरणात गुंतवले जात आहे. तसेच कलम 169 नुसार माझे नाव या प्रकरणातून वगळण्यात येणार आहे. तसे पोलिसांनी मला सांगितले आहे. कार्यकर्त्यांचा फोन आला म्हणून मी त्या ठिकाणी गेलो होतो. यात माझा कसलाही संबंध नाही. मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण माझा व्यवस्थेवर विश्वास आहे", अशी भूमिका खांडे यांनी मांडली होती.

First published: