शिवसेना नेता म्हणाला, शरद पवारांचे सर्व दात पडले, फक्त 'सुळे' शिल्लक

केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात देखील विरोधीपक्ष नसेल...

News18 Lokmat | Updated On: Oct 18, 2019 08:57 PM IST

शिवसेना नेता म्हणाला, शरद पवारांचे सर्व दात पडले, फक्त 'सुळे' शिल्लक

चंद्रकांत बनकर,(प्रतिनिधी)

खेड,18 ऑक्टोबर: शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याव घणाघाती टीका केली आहे. शरद पवारांचे सर्व दात पडले आहेत फक्त 'सुळे' शिल्लक आहेत, अशी अवस्था राष्ट्रवादी पक्षाची झाली असल्याची टीका अनंत गीते यांनी केली आहे.

खेडमध्ये दापोली विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर युतीचे उमेदवार योगेश कदम यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या प्रचारसभेला अनंत गीते यांनी केली आहे. राष्ट्रवादी पक्षावर सर्व स्तरातून टीका होतेय या टीकांना उत्तर देण्यासाठी शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे पुढे सरसावल्या आहेत. या पार्श्वभूमीवर माध्यमांवर आणि सोशल मीडियावर असे विडंबन केले जात आहे. पुढे ते म्हणाले, केंद्राप्रमाणे महाराष्ट्रात देखील विरोधीपक्ष नसेल एवढ्या जागा युतीला मिळतील, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

मुख्यमंत्री 'रेवडी' पैलवान..शरद पवारांचा टोला

दरम्यान, बीड जिल्ह्यातील आंबेजोगाई येथे धनंजय मुंडे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत शरद पवार यांनी कलम 370 वरून नरेंद्र मोदी यांचा समाचार घेतला तर

Loading...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 'रेवडी' पैलवान असून रेवड्यांवरची कुस्ती आम्ही खेळत नाही, असा टोला शरद पवार यांनी यावेळी लगावला.

यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते धनंजय मुंडे, केज राष्ट्रवादीचे उमेदवार पृथ्वीराज साठे, जिल्हा अध्यक्ष बजरंग सोनवणे, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष राजकिशोर पापा मोदी यांची उपस्थित होते.

शरद पवार यांनी भाजपवर हल्ला चढवला. भाजप प्रत्येक प्रश्नाला 370 सांगतात सगळ्या प्रश्नाला उत्तर फक्त 370 असें सांगतात. मूलभूत प्रश्न बाजूला आहे. शेतकरी, बेरोजगार, उद्योग बंद पाडले आणि सांगतात 370 चा निर्णय म्हणे, 56 इंच छातीने घेतला ते कोण निर्णय घेणारे हा निर्णय पार्लमेंटने घेतला असे म्हणत कलम 370 चा समाचार घेतला. महाराष्ट्रात सध्या सगळीकडे चर्चा परळीची देशाचे पंतप्रधान आले. गुरूवारी परळीत काय बोलायचं तें बोलले पण परळीची जागा जिंकायची तर पंतप्रधानांशिवाय दुसरे गत्यंतर नाही. या निष्कर्शापर्यंत भाजप आली. मला खात्री आहे परळीची बहाद्दर जनता धनंजय मुंडेंला निवडून देईल. कारण सत्ता परिवर्तन ही महाराष्ट्राची गरज आहे. हे तुम्हाला कळले आहे. धनंजय मुंडे परळीतून निवडणूक जिंकणार, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला. तसेच शहा, मोदी, योगी येऊन टीका करतात. पवारांनी काय केले, माझं नाव घेतल्याशिवाय यांची सभा पूर्ण होत नाही, हे झोपेत पण चावळत असतील असा टोला लगावला.

मोठी गंमतीची गोष्ट भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, आमचा पैलवान तेल लावून तयार आहे. समोर पैलवान कुठे.. पण आम्ही रेवड्यावरची कुस्ती खेळत नाही. माझ्या आयुष्यात चौदा निवडणुका लढल्या त्यात 7 राज्य 7 केंद्र एकदा पण पराभव नाही. आत्ता नव्या पिढीला पुढे आणून महाराष्ट्र त्यांच्यात हातात द्यायचा, असे मत पवारांनी व्यक्त केले.

भाजप सत्तेचा वापर करुन खोट्या केसेस करते. चिदंबरम यांना आत टाकले निवडणुकीत तोंड देता येत नाही. म्हणून खोटे खटले आणि बदनाम करतात माझ्यावर खटला भरला त्यांची पंचाईत झाली.अशा लोकांना सत्तेच्या बाहेर घालवल्याशिवाय राहणार नाही. असे म्हणत केज आणि परळी विधानसभा मतदार संघात प्रचंड मताधिक्याने धनंजय मुंडे आणि पृथ्वीराज साठे यांना विजयी करा, असे आवाहन केले.

भाऊ कदम आणि श्रेया बुगडे प्रचार रॅलीत, पाहा हा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 18, 2019 08:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...