मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /...तोपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नका, रोहिणी खडसेंच्या गाडी हल्ल्यावर गुलाबराव पाटील बोलले

...तोपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नका, रोहिणी खडसेंच्या गाडी हल्ल्यावर गुलाबराव पाटील बोलले

मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे.

मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे.

इम्तियाज अली, प्रतिनिधी

मुक्ताईनगर, 30 डिसेंबर : राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्या कन्या आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिनी खडसे (rohini khadse)  यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये वाद पेटला आहे. पण, या प्रकरणाची आयपीएस अधिकाऱ्यांना मार्फत निपक्षपणे  चौकशी करा, दोषी असतील कारवाई करू पण तोपर्यंत शिवसेनेला बदनाम करू नका, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (Shiv Sena leader Gulabrao Patil) यांनी दिली.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर मतदारसंघात गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (shivsena) आणि राष्ट्रवादी (ncp) पदाधिकाऱ्यांमध्ये वाद पेटला आहे. अशातच 27 डिसेंबरला रोहिणी खडसे खेवलकर यांच्या वाहनावर अज्ञात इसमाने दगडफेक केली. या घटनेवर अखेर शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.

रोहिणी खडसे यांच्या गाडीवर  झालेला हल्ला हा निषेधार्य असून विशेष आयपीएस अधिकाऱ्यांना मार्फत निपक्षपणे या घटनेची चौकशी व्हावी, अशी मागणीच गुलाबराव पाटील यांनी केली.

(चीनमध्ये दर वर्षी होते1 कोटी कुत्र्यांची हत्या; पण का? धक्कादायक कारण वाचाच)

तसंच, 'चौकशीनंतर दूध का दूध पानी का पानी होईलच, त्यात आमच्या पक्षातील दोषी आढळला तरी ही बाब चुकीची असून त्याच्याबाबत गय केली जाणार नसल्याचे नाही. मात्र जोपर्यंत याबाबत चौकशी होत नाही तोपर्यंत शिवसेना पक्षाला बदनाम करू नये' असा सल्लाही पाटील यांनी राष्ट्रवादीला दिला.

काय आहे प्रकरण?

जळगावात शिवसेना राष्ट्रवादी यांच्यात वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील व राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसे यांच्यातील आरोप-प्रत्यारोपमुळे मुक्ताईनगरमध्ये महाविकास आघाडीत तणावपूर्ण वातावरण आहे. अशातच 27 डिसेंबर रोजी

रोहिणी खडसे या मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव इथं विवाहाच्या निमित्ताने हळदीच्या कार्यक्रमाला गेल्या होत्या. हळदीचा कार्यक्रम आटोपून त्या घरी परत येत होत्या. रोहिणी खडसे या आपल्या फॉर्च्युनर गाडीने येत असताना अचानक काही इसमांनी हल्ला केला. रोहिणी खडसे यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. अचानक झालेल्या दगडफेकीनंतर एकच गोंधळ उडाला. या घटनेनंतर खडसे समर्थकांची घराजवळ गर्दी जमली असून वातावरण तापले आहे.

First published:

Tags: Gulabrao patil, गुलाबराव पाटील