मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोमैय्यांच्या डोक्यावर परिणाम, तो एहसान फरामोश माणूस; शिवसेना नेत्यानं सोडला 'बाण'

सोमैय्यांच्या डोक्यावर परिणाम, तो एहसान फरामोश माणूस; शिवसेना नेत्यानं सोडला 'बाण'

ज्यांच्या पायाजवळ बसून खासदार झालात आज त्यांच्यावरच टीका....

ज्यांच्या पायाजवळ बसून खासदार झालात आज त्यांच्यावरच टीका....

ज्यांच्या पायाजवळ बसून खासदार झालात आज त्यांच्यावरच टीका....

जळगाव, 13 नोव्हेंबर: धमकी देणं शिवसेनेला जमतं. हिंमत असेल तर माझ्याविरोधात पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार करावी, अशा शब्दांत भाजपचे नेते किरीट सोमय्या (Bjp Leader kirit somaiya) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  (CM Udhav thackeray)आणि शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना आव्हान दिलं आहे. मात्र, किरीट सोमैया (Bjp Leader kirit somaiya) आता शिवसेनेच्या रडारवर आले आहेत.

भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. त्यांनी ठाण्यातील रूग्णालयात उपचार घ्यावेत, अशी टीका  शिवसेना नेते आणि राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे. त्यांना शॉक दिल्याशिवाय ते त्यांचे बेताल वक्तव्य बंद होणार नाहीत, असा इशाराही गुलाबराव पाटील यांनी दिला आहे.

हेही वाचा..किरीट सोमैयांचा शिवसेनेवर पलटवार! महापौर, ठाकरे सरकारविरोधात हायकोर्टात याचिका

किरीट सोमैया हा एहसान फरामोश माणूस आहे. ज्यांच्या पायाजवळ बसून खासदार झालात आज त्यांच्यावर टीका करत आहे, असंही गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, कथित जमीन व्यवहार प्रकरणी किरीट सोमैया यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे. तसंच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आर्थिक व्यवहाराबद्दल उत्तर द्यावे, असंही सोमय्या म्हणाले.

आणखी काय म्हणाले किरीट सोमैया?

अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणावरून भाजपचे नेते किरीट सोमय्यांनी यांनी ठाकरे कुटुंबावर गंभीर आरोप केला आहे. आज पुन्हा एकदा सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. या सरकारच्या वर्षपूर्तीआधी आणखी तीन घोटाळे बाहेर काढणार आहे. याचा तपास लोकायुक्तांनी करावा असे निर्देश राज्यपालांनी दिले आहेत. यावर संजय राऊत आणि शिवसेना नेते का बोलत नाहीत. धमकी देण्याची भाषा संजय राऊतांची आहे. आम्ही त्या भाषेत बोलणार नाहीत. राऊतांमध्ये हिंमत असेल तर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार करावी, ही माझी वॉर्निंग आहे. हिंमत असेल तर त्यांनी माझ्यावर कारवाई करुन दाखवावी, असा पलटवार सोमय्यांनी केला आहे.

30 सातबाऱ्यांवर अन्वय नाईक परिवार आणि रश्मी ठाकरे यांचे एकत्रित नाव आहे. मुळ मुद्दे भरकवटण्याचा प्रयत्न केले जात आहे. नाईक, वायकर आणि ठाकरे परिवारात काय आर्थिक लागेबांधे काय आहेत? उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी आर्थिक व्यवहार केले आहेत, त्याची उत्तरं द्यावीत, असंही सोमय्या म्हणाले.

सोमय्यांचा ठाकरे मुंबईच्या महापौरांवर गंभीर आरोप

दरम्यान, मुंबईत गरीब झोपडपट्टी वासीयांसाठी बांधण्यात आलेले अर्धा डझणाहून अधिक गाळे अपारदर्शकरित्या महापौर यांनी स्वत:च्या परिवाराच्या ताब्यात ठेवले आहेत, असा घणाघाती आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे. याबाबत सर्व पुरावे याचिकेत दिले आहेत, असंही त्यांनी जाहीरपणे सांगितलं.

हेही वाचा..शरद पवारांच्या बारामतीत नगरपालिकेवर पहिल्यांदा फडकले काळे झेंडे!

काय म्हणाले होते राऊत?

'एका महिलेचं कुंकू पुसलं गेलं. अक्षता नाईक आणि त्यांची मुलगी गेल्या अनेक वर्षांपासून आक्रोश करत आहे. शेठजींच्या पक्षाचे प्रवक्ते काही बोलायला तयार नाही. आम्ही जेव्हा त्या अबलेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत तेव्हा या प्रकरणाचा तपास भरकटून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. तपासाची दिशा बदलून टाकण्यासाठी शेटजींच्या पक्षाचे नेते तेव्हा हे अत्यंत फालतू असे मुद्दे घेऊन समोर येत आहे' अशी टीका संजय राऊत यांनी केली होती.

तसंच, 'म्हणे, 21 व्यवहार केले आहे. ते दाखवावे, हा खोटारडेपणाचा कळस आहे. एक लक्षात घ्या, त्यांनाही वॉर्निंग आहे. हे सरकार पाच वर्ष पूर्ण करणार आहे' असा इशाराही राऊत यांनी दिला.

First published:

Tags: Maharashtra, Sanjay raut, Shiv sena, Udhav thackeray