मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

''एका बाईला चॅनेलनं इतकं उचलून ठेवलं की...'', नाव न घेता गुलाबराव पाटील यांची नवनीत राणा यांच्यावर टीका

''एका बाईला चॅनेलनं इतकं उचलून ठेवलं की...'', नाव न घेता गुलाबराव पाटील यांची नवनीत राणा यांच्यावर टीका

शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Shiv Sena leader Gulabrao Patil) यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Shiv Sena leader Gulabrao Patil) यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Shiv Sena leader Gulabrao Patil) यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

  • Published by:  Pooja Vichare

मुंबई, 30 मे: पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांच्यावर निशाणा साधला आहे. एका बाईला चॅनलने इतका उचलून ठेवलं की टीव्ही पाहण्याचा कंटाळा यायला लागला, अशा शब्दात शिवसेना नेते गुलाबराव पाटील (Shiv Sena leader Gulabrao Patil) यांनी नाव न घेता नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.

पाचोरा येथे शिवसंपर्क अभियानाच्या समारोप मेळावा प्रसंगी शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी टीका केली आहे. टीव्ही चॅनल आणि वृत्तपत्रांवर देखील गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान आता कार्यकर्त्यांना स्वतःलाच वृत्तपत्र वृत्तवाहिनी होऊन काम करावं लागेल असेही यावेळी गुलाबराव पाटील म्हणाले.

राणा दाम्पत्य अमरावतीत दाखल, ठिकठिकाणी जंगी स्वागत

14 दिवस तुरुंगवास झाल्यानंतर राणा दाम्पत्य 36 दिवसांनी विदर्भात दाखल झालेत. अमरावतीत आगमन होताच राणा दाम्पत्यांचं ठिकठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले.. याशिवाय ठिकठिकाणी हनुमान चालीसा पठण देखील करण्यात आले. यानंतर राणा दाम्पत्य त्यांच्या अमरावतीतील गंगा सावित्री निवास्थानी पोहचल्यानंतर दाम्पत्याचा कार्यकर्त्यांकडून दुग्धभिषेक सोहळा पार पडला. यावेळी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा दोघांना सोबत बसवून दुग्धभिषेक करण्यात आला.राणा दाम्पत्य येथून नागरिकांच्या समस्या सोडविताना एक नवा संकल्प करून पुढील वाटचाल करणार असल्याचे राणा दाम्पत्यांनी सांगितलं आहे.

महाराष्ट्रात दाखल होताच राणा दाम्पत्याचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

खासदार नवनीत राणा यांनी म्हटलं, आम्ही 36 दिवसांनी परतलो आहोत. महाराष्ट्रात हनुमान चालिसा बोलण्यास इतका विरोध का होत आहे? दिल्लीत आम्ही हनुमान चालिसा पठण केलं, रॅली काढली त्यावेळी तिथे सुरक्षा व्यवस्था होती. इथे महाराष्ट्रात रामाचा विरोध, हनुमान चालिसाला इतका विरोध का होत आहे. आज शनिवार आहे. महाराष्ट्राला लागलेला शनी दूर झाली पाहिजे आणि त्यासाठी आज आम्ही हनुमान चालिसा पठण करत आहोत.

Goa foundation day : स्वातंत्र्यानंतरही 14 वर्ष गोवा का राहिला गुलाम? महाभारतही आहे उल्लेख 

आमदार रवी राणा यांनी म्हटलं, बजरंगबली यांचे आशीर्वाद घेण्यासाठी नागपुरातील प्राचीन मंदिरात आम्ही दर्शन घेणार आहोत. तेथे हनुमान चालिसा पठण करणार आहोत. पण आम्ही महाराष्ट्रात पाय ठेवताच मुख्यमंत्र्यांची झोप उडते. म्हणून हनुमान चालिसा पठणला विरोध कऱण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पोलिसांची फौज इथे उभी केली आहे. येत्या काळात हनुमान भक्त आणि राम भक्त या मुख्यमंत्र्यांना धडा शिकवेल. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून महाराष्ट्रात आलेलं संकट आम्हाला दूर करायचं आहे.

First published:

Tags: Gulabrao patil, Navneet Rana, Shiv sena