बोदवड, 18 डिसेंबर : राज्यात नगर पंचायतीच्या निवडणुका पार पडत आहे. जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेत शिवसेनेचे (shivsena) नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी 'राम तेरी गंगा मैली हो गयी' म्हणत राष्ट्रवादीचे (ncp) नेते एकनाथ खडसे (eknath khadse) यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सभेत एकच हश्या पिकली.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत तडाखेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला.
'गेले तीस वर्ष जो पिक्चर तुम्ही पाहिला तरी तुम्ही बोर होत नाही, आता मुक्ताईनगर मतदारसंघात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील हा सरळ चालणारा हिरो आहे. तेव्हा आता शिवसेनेचा पाच वर्षांचा पिक्चर पाहा. आमचे कोणतीही बाप, दादा ग्रामपंचायतीचा मेंबर नव्हता आणि आम्ही धोकेबाज किंवा गद्दार पण नाही' असे म्हणत गुलाबराव पाटील यांनी नाव न घेता खडसेंना चिमटा काढला.
हेही वाचा - फिक्सिंग रोखण्यासाठी BCCI चे 'ब्रम्हास्त्र', खेळाडूंच्या अडचणी वाढणार!
तसंच, राज कपूरने पहिले पिक्चर काढला त्यात जे त्यांनी 'हम ऊस जिस देश के वासी है जिस देश में गंगा बहती है ' हे गाणे दिले होते. पण आता दहा-बारा वर्षांमध्ये देशाचे चित्र बदललं आहे. राज कपूरचं गाणं बदलून गेलं असून ते म्हणजे 'राम तेरी गंगा मैली हो गई' असं म्हणत गेली तीस वर्षे एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगर मतदारसंघात 30 वर्ष वर्ष होतो. मात्र कुठलीही विकासकामे झाली नसून घराणेशाही झाल्याची टीका गुलाबराव पाटील यांनी खडासेंवर केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse, Gulabrao patil, गुलाबराव पाटील, निवडणूक