मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'मुक्ताईनगर शहर हे मध्येच टांगलेला बोकड' गुलाबराव पाटलांचा खडसेंवर निशाणा?

'मुक्ताईनगर शहर हे मध्येच टांगलेला बोकड' गुलाबराव पाटलांचा खडसेंवर निशाणा?


जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 'पालकमंत्री आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 'पालकमंत्री आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला.

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 'पालकमंत्री आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला.

  • Published by:  sachin Salve
जळगाव, 24 जुलै : 'मुक्ताईनगर (muktainagar jalgaon) हे ना शहर, ना खेड , मधलं टांगलेला बोकड अशी परिस्थिती झालेली आहे. एकीकडे मोठ्या मोठ्या गोष्टी करायच्या मात्र साधे रस्ते, पाणी देऊ शकत नाही ही लांच्छनास्पद बाब असल्याची टीका शिवसेनेचे (shivsena) नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील (gulabrao patil) यांनी मुक्ताईनगर येथे केली. पण, राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे हे गेले 30 वर्ष याच मतदारसंघातून आमदार होते. त्यामुळे गुलाबराव पाटील यांनी थेट एकनाथ खडसे (eknath khadse) यांचं नाव न घेता निशाणा साधला का अशी चर्चा रंगली आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसंपर्क अभियानाअंतर्गत 'पालकमंत्री आपल्या दारी' हा कार्यक्रम पार पडला. यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी चांगलीच टोलेबाजी केली. 'मुक्ताईनगर च्या विकासासाठी आम्ही शासनाकडून 2 वर्षात कामे करून घेणार असून आमच्या कामाची तुलना करा, असा थेट इशाराच' यावेळी  गुलाबराव पाटील यांनी दिला.

महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नग्न फोटो केले व्हायरल, बुलडाण्यातील संतापजनक घटना

तसंच, भाजपचे माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील फक्त आपल्या मतदारसंघा पुरती काम करत असल्याची टीका केली होती. यावर गुलाबराव पाटील म्हणाले की, 'चंद्रशेखर बावनकुळे यांना साधं पक्षाने तिकीट दिले नाही. त्यामुळे त्यांनी पक्षाची बढाई मारू नये. पक्षात लायकी नसताना दुसऱ्यांवर बोलण्याची गरज नसून पहिलं आपलं दुकान पक्क करा मग माझ्यावर टीका करा' असा पलटवार गुलाबराव पाटील यांनी केला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना कोरोनाचा पडला विसर दरम्यान,  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर येथे शिवसेनेच्या शिव संपर्क अभियानांतर्गत पालकमंत्री आपल्या दारी या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने शिवसेनेला कोरोनाचा विसर पडला की काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांमधून उपस्थित केला जात आहे.

मद्यपान करताना 'हे' पदार्थ चुकूनही खाऊ नका!

एकीकडे कोरोना च्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना पालक मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीतच शासनाने दिलेल्या नियमांची पायमल्ली करून सदर कार्यक्रमात सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला. एवढंच नाहीतर अनेकांना मास्कचा देखील विसर पडला असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे सर्वसामान्यांना वेगळा न्याय व सत्ताधाऱ्यांना वेगळा न्याय का? असा देखील प्रश्न यावेळी उपस्थित निर्माण होतोय.
First published:

Tags: Jalgaon

पुढील बातम्या