शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक, 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक, 70 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक झालाय. त्यांच्या मातोश्री गंगुबाई शिंदे (वय-70) यांचं बुधवारी रात्री उशिरा अल्पश: आजाराने निधन झालं.

  • Share this:

ठाणे, 18 एप्रिल- शिवसेनेचे नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांना मातृशोक झालाय. त्यांच्या मातोश्री गंगुबाई शिंदे (वय-70) यांचं बुधवारी रात्री  11 वाजता अल्पश: आजाराने निधन झालं. त्यांच्यावर ठाण्यातील एका खासगी हॅास्पिटलमध्ये उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. एकनाथ शिंदे हे डहाणू येथे प्रचारात होते. त्यावेळी त्यांना आईच्या निधनाचे वृत्त समजले. त्यानंतर ते तातडीने ठाण्यात पोहोयले. कल्याणचे विद्यमान खासदार आणि उमेदवार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या त्या आजी होत.

गंगुबाई शिंदे यांच्या पश्चात पती संभाजी शिंदे,एकनाथ, सुभाष आणि प्रकाश ही तीन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

सकाळी 11 वाजता लुईसवाडी या त्यांच्या निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघणार आहे. पार्थिवावर ठाण्याच्या वागळे इस्टेट स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

एकनाथ शिंदे हे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि शिवसेना विधिमंडळ गटनेते पदाचाही कार्यभार सांभाळत आहेत.

VIDEO: मोदींच्या 'कास्ट कार्ड'वर प्रकाश आंबेडकरांचा हल्लाबोल

First published: April 18, 2019, 12:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading