Home /News /maharashtra /

आमदारांच्या बैठकीचा Exclusive VIDEO : उद्धव ठाकरेंच्या संवादनंतर एकनाथ शिंदेंच्या गोटात काय झालं?

आमदारांच्या बैठकीचा Exclusive VIDEO : उद्धव ठाकरेंच्या संवादनंतर एकनाथ शिंदेंच्या गोटात काय झालं?

कनाथ शिंदे यांच्या गोटातील घडामोडींचा Exclusive व्हिडीओ 'न्यूज18 लोकमत'च्या हातील लागला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसोबत चर्चा करताना दिसत आहेत.

    मुंबई, 22 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे बंडखोर आमदारांना स्वगृही परतण्याचं आवाहन केलं. उद्धव ठाकरे यांनी आपण मुख्यमंत्रीपदही सोडण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. तसेच आमदार किंवा शिवसैनिकांनी सांगितलं तर शिवसेना पक्षप्रमुखपदही सोडायला तयार असल्याचं देखील ते म्हणाले. त्यांच्या या भावनिक सादनंतर एकनाथ शिंदे परत येतात का हे पाहणं महत्त्वाचं मानलं जात होतं. पण मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गोटात नेमक्या काय हालचाली घडल्या याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे यांच्या गोटातील घडामोडींचा Exclusive व्हिडीओ 'न्यूज18 लोकमत'च्या हातील लागला आहे. या व्हिडीओत एकनाथ शिंदे आपल्या सहकारी आमदारांसोबत चर्चा करताना दिसत आहेत. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी देखील इमोशनल उत्तर दिलं आहे. शिंदे सध्या त्यांच्या समर्थक आमदारांसह गुवाहाटीमध्ये आहेत. त्यांनी यावेळी थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या विचारांचा दाखला देत उत्तर दिलं आहे. काँग्रेससोबत जायचं नाही, हे बाळासाहेबच बोलले होते. त्यावर मुख्यमंत्री काहीच बोलले नाहीत. समविचारी पक्षांसोबत राहायचं ही बाळासाहेबांचे हे मुख्य विचार आहेत, अशी भावनिक साद शिंदे यांनी घातली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनानंतर शिंदे त्यांच्या समर्थक आमदारांशी चर्चा करत असून या चर्चेनंतरच ते मुख्यमंत्र्यांना उत्तर देणार आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांनी भावनिक साद घातल्यानंतरही एकनाथ शिंदे आपल्या भूमिकेपासून मागे हटायला तयार नाहीत. त्यांनी ट्विटरवर चार मुद्दे टाकत सरकार बरखास्त करण्याबाबतची आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली आहे. "गेल्या अडीच वर्षात म.वि.आ. सरकारचा फायदा फक्त घटक पक्षांना झाला, आणि शिवसैनिक भरडला गेला. घटक पक्ष मजबूत होत असताना शिवसैनिकांचे आणि शिवसेनेचे मात्र पद्धतशीर खच्चीकरण होत आहे. पक्ष आणि शिवसैनिक टिकविण्यासाठी अनैसर्गिक आघाडीतून बाहेर पडणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे आहे", अशी आक्रमक भूमिका शिंदेंनी घेतली आहे. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांना पत्र लिहलंय. या पत्रामध्ये 34 आमदारांच्या सह्या आहेत. शिवसेनेच्या 55 पैकी 34 आमदारांच्या या पत्रावर सह्या असल्यानं बहुसंख्य आमदार हे शिंदे यांच्यासोबत आहेत, त्यामुळे ठाकरे सरकार आता अल्पमतामध्ये आलं आहे. विधानसभेतील बहुमतदासाठी आवश्यक असलेली 145 आमदारांची मॅजिक फिगर महाविकास आघाडी सरकारकडं नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. शिवसेना विधिमंडळ मुख्य प्रतोद पदी शिवसेना आमदार भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सबब, श्री.सुनील प्रभू यांनी आजच्या आमदारांच्या बैठकीबद्दल काढलेले आदेश कायदेशीरदृष्ट्या अवैध आहेत, असं ट्वीट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या