Home /News /maharashtra /

'बापाची चप्पल घातली तर बाप होत नाही', एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर पलटवार

'बापाची चप्पल घातली तर बाप होत नाही', एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीच्या नेत्यावर पलटवार

'आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते

'आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते

'आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते

मनमाड, 16 जानेवारी : ठाण्यातील खारेगाव उड्डाणपूलाचा (Kharegaon flyover in Thane) श्रेयवादावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये शाब्दिक युद्ध सुरूच आहे. 'बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसं वागायला पाहिजे होतं असं म्हणात शिवसेनेचे नेते आणि नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी राष्ट्रवादीचे नेते आनंद परांजपे ( Anand Paranjape) यांनाी चोख उत्तर दिले. नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे आज एका खाजगी कार्यक्रमासाठी मनमाडला आले होते. त्यावेळी त्यांनी प्रसार माध्यमांशी  बोलतांना परांजपे यांना उत्तर दिले. 'आनंद परांजपे यांचे वडिल प्रकाश परांजपे यांना शिवसेनेने जो मानसन्मान दिला त्यामुळे त्यांची चप्पल घालून त्याने काम करायला पाहिजे होते मात्र त्यांना ते जमले नाही,बापाची चप्पल मुलाने घातली तर तो बाप होत नाही, त्यांनी निदान तसं वागायला पाहिजे, असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला. (फोटोमध्ये दिसणाऱ्या या चिमुकलीला ओळखणं आहे कठीण, आज आहे प्रसिद्ध अभिनेत्री) 'सरकारचे काम व्यवस्थितीत सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाले आहे. कोरोनाचे संकट हे अचानकपणे राज्यावर आले. या काळात उद्धव ठाकरे यांनी उत्तमपणे नियोजन करून परिस्थिती हाताळली. आपल्याला सुरुवातील पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत तारेवर कसरत करावी लागली. कोर्टाने सुद्धा राज्य सरकारचे कौतुक केले आहे. या काळात सरकारने कोणत्याही विकासकामाला ब्रेक लागू दिला नाही. मुळात भाजपच्या नेत्यांना सरकार स्थापन झाल्यापासून पचनी पडत नाही, त्यामुळे त्यांचे नको ते उद्योग सुरू आहे', असा सणसणीत टोला एकनाथ शिंदे यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना लगावला. खारेगाव उड्डाणपुलावरून काय आहे वाद? ठाण्यातील कळवा येथे खारेगाव उड्डाणपुल लोकार्पण सोहळा शनिवारी पार पडला. पण यावेळी शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे नेते गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला होता. लोकार्पणाआधीच शिवसेनेने उड्डाणपुलावर “सततच्या पाठपुराव्याला यश” अशी बॅनरबाजी करत सर्वत्र भगवे झेंडे लावले होते. हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिव्हारी लागले. बघता बघता काही मिनिटातच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सर्वत्र राष्ट्रवादीचे झेंडे आणि बॅनर लावले ज्यावर “वचनपूर्ती” असं लिहिलं गेलं जे शिवसेनेच्या जिव्हारी लागलं. (विरार हादरलं! संपत्तीच्या वादातून भावाचे बहिणीवर कोयत्याने वार,घटनेचा LIVE VIDEO) यानंतर श्रीकांत शिंदे यांनी आपण केलेल्या पाठपुराव्याचा आढावा सांगितला आणि एक प्रकारे त्यांनीच हे सर्व केल्याचे त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. तर, मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 'महाविकास आघाडीचेच सर्व आहेत हे सांगताना खासदार श्रीकांत शिंदे यांचे नाव घेता परिपक्वता आली पाहिजे कोणी काय केले हे कळव्याच्या जनतेला माहितीये' अशा शब्दांत पलटवार केला. एवढंच नाहीतर पत्रकार परिषद घेऊन “ या उड्डाणपुलाला आनंद परांजपे यांनी मंजुरी मिळवली, मध्ये वेळ का लागला तेव्हा त्याचाही लोकांनी विचार करावा, कसं आहे ना आम्ही बापाच्या भूमिकेत आहोत. ते तरुण रक्त आहे सळसळत रक्त आहे परिपक्वता आली पाहिजे” अशी टीका आव्हाड यांनी श्रीकांत शिंदे यांच्यावर केली होती.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या