महाड दुर्घटनेत बचावलेल्या त्या 4 वर्षीय मुलांचं एकनाथ शिंदेंनी स्विकारलं पालकत्त्व!

महाड दुर्घटनेत बचावलेल्या त्या 4 वर्षीय मुलांचं एकनाथ शिंदेंनी स्विकारलं पालकत्त्व!

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती.

  • Share this:

मुंबई, 27 ऑगस्ट: रायगड जिल्ह्यातील महाड येथील पाच मजली इमारत कोसळल्यामुळे आपले संपूर्ण कुटुंब गमावलेल्या 4 वर्षांच्या दोन लहानग्यांचे पालकत्त्व शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वीकारले आहे.

हेही वाचा...विघ्नेश्वर गणपतीचे चोर अखेर पोलिसांच्या जाळ्यात, दीड किलोची चांदीची छत्री जप्त

मोहम्मद बांगी आणि अहमद शेखनाग अशी या दोन लहानग्यांची नावे आहेत. तब्बल 18 तासांच्या प्रयत्नानंतर मोहम्मद बांगी याला ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात मदत पथकाला यश आले होते. परंतु, त्याची आई आणि भावंडांचा मात्र दुर्दैवी अंत झाला. तर इमारत कोसळत असताना अहमद शेखनाग वेळीच बाहेर पडल्यामुळे तो बचावला मात्र त्याचे कुटुंबीय मृत पावले.

या दोन्ही लहानग्यांचे पालकत्त्व स्वीकारत असल्याचे एकनाथ शिंदे यांनी जाहीर केलं आहे. दोन्ही मुलांच्या नावे बँक खात्यात प्रत्येकी 10 लाख रुपये फिक्स्ड डिपॉझिटमध्ये ठेवण्यात येतील. तसेच त्यांच्या संपूर्ण शिक्षणाची जबाबदारी शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने उचलण्यात येणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

या दुर्घटनेचे वृत्त समजताच एकनाथ शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून मदतकार्याला वेग दिला होता. ठाणे महापालिकेची 2 आपत्कालीन पथके आणि अग्निशमन दलाची तुकडीही शिंदे यांच्या आदेशानुसार मदतकार्यात व्यग्र आहे.

80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण ही आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांची आम्हाला शिकवण होती.

हेही वाचा...पेन्शनसाठी 60 वर्षाच्या मजूर मुलानं आईला पाठीवरून नेलं बँकेत आणि...

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना आजही याच तत्वानुसार वाटचाल करत आहे. त्यामुळे सामाजिक जाणिवेच्या भावनेतून या मुलांचे पालकत्त्व स्वीकारत असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Published by: Sandip Parolekar
First published: August 27, 2020, 7:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading