उस्मानाबादेत ग्रामपंचायतीसमोरच शिवसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

उस्मानाबादेत ग्रामपंचायतीसमोरच शिवसेनेच्या नेत्याची निर्घृण हत्या

भूम तालुक्यातील देवळाली गावात ही घटना घडली असून गावातील ग्रामपंचायती समोरच त्यांचा खून केला आहे.

  • Share this:

उस्मानाबाद, 27 मे :  उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालुक्यातील वंजारवाडी  पंचायत  समितीचे शिवसेनेचे  विद्यमान सदस्य बाजीराव तांबे यांची ग्रामपंचायतीच्या समोरच  निर्घृणपणे खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली आहे.

भूम तालुक्यातील देवळाली गावात ही घटना घडली असून गावातील ग्रामपंचायतीसमोरच त्यांचा खून केला आहे. गावातील शिवरस्त्यावरून या बाजीराव तांबे आणि त्यांच्या चुलत भाऊ चंद्रकांत तांबे  यांच्यात गेली अनेक दिवस वाद सुरू होते.

हेही वाचा -पत्नी रोज करायची भांडण, पतीने हत्या करुन मृतदेह फेकला नाल्यात

या प्रकरणी दोन्ही गटाकडून पोलिसांत व महसूल विभागात तक्रारी देखील केल्या होत्या. या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू होती.

मात्र, 26 मे रोजी मंगळवारी रात्री मयत बाजीराव तांबे आणि मुख्य आरोपी चंद्रकांत तांबे यांच्यामध्ये पुन्हा वाद झाला. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर त्यांच्या चुलत भावाने  बाजीराव यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला केला. त्यात ते गंभीर जखमी झाले.

बाजीराव तांबे रस्त्यावरच रक्ताच्या थारोळ्यात पडले होते.  त्यांना पुढील उपचारासाठी तातडीने बार्शी हलवण्यात आले. परंतु, तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासून बाजीराव तांबे यांना मयत घोषित केलं.

हेही वाचा -तुमच्याही हृदयाला पडेल पिळ, रखरखत्या उन्हात उभं राहून ट्रेनची प्रतिक्षा, अखेर...

बाजीराव यांच्यावर हल्ला करणारे त्यांचे चुलत बंधू चंद्रकांत तांबे  याच्यासह   12 जणांविरोधात परंडा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एका आरोपीला अटक केली असून 11 जण हे फरार आहेत.  या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: May 27, 2020, 1:38 PM IST
Tags: shivsena

ताज्या बातम्या