'मोदी पुन्हा PM झाले तर तिरंगा चाँद पर लहरायेगा..अन्यथा तिरंगे पर चाँद होगा!'

'मोदी पुन्हा PM झाले तर तिरंगा चाँद पर लहरायेगा..अन्यथा तिरंगे पर चाँद होगा!'

शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन प्रशंसा केली आहे. 'नरेंद्र मोदी पुन्हा PM झाले तर तिरंगा चाँद पर लहरायेगा..अन्यथा तिरंगे पर चाँद होगा!', असे वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले आहे.

  • Share this:

मुंबई, २२ एप्रिल- शिवसेनेचे विद्यमान खासदार आणि दक्षिण मुंबईतील उमेदवार अरविंद सावंत यांनी एका कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भरभरुन प्रशंसा केली आहे.

'नरेंद्र मोदी पुन्हा PM झाले तर तिरंगा चाँद पर लहरायेगा..अन्यथा तिरंगे पर चाँद होगा!', असे वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले आहे. मुंबईतील माधवबागेत 'चाय पे चर्चा' या कार्यक्रमात अरविंद सावंत यांनी व्यापाऱ्यांशी संवाद साधला.

अरविंद सावंत हे दक्षिण मुंबईतू्न काँग्रेसचे मिलिंद देवरा यांच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. अरविंद सावंत म्हणाले, मिलिंद देवरा यांनी माझ्यावर आरोप करण्यापूर्वी हे पाहावे की त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधी हे जामिनावर तुरुंगाबाहेर आहेत.

अरविंद सावंतांनी केला मोठा खुलासा..

अरविंद सावंत यांनी मोठा खुलासा केला आहे. तो म्हणजे शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा, अशी काँग्रेसची इच्छा आहे. सावंत म्हणाले, 2014 नंतर महाराष्ट्रात काँग्रेसने राष्ट्रवादीशी आघाडी केली. शिवसेने- भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर शिवसेनाला मुख्यमंत्रिपदाचीही ऑफर दिली होती. परंतु आम्ही भाजपची साथ सोडली नाही.

First published: April 22, 2019, 7:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading