शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्या रावसाहेबांचं शेतकरी प्रेम 'बेगडी', खोतकरांनी घेतला समाचार

शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्या रावसाहेबांचं शेतकरी प्रेम 'बेगडी', खोतकरांनी घेतला समाचार

शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागं झालं, असा खोचक सवाल शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला

  • Share this:

जालना, 18 ऑक्टोबर: ज्यांनी शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधलं. त्या भाजप नेत्यांचं शेतकरी प्रेम बेगडी आहे. शेतकऱ्यांबद्दल त्यांचं प्रेम कधीपासून जागं झालं, असा खोचक सवाल शिवसेना नेते व माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भाजप नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना केला आहे.

'घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय?', अशी खोचक टीका रावसाहेब दानवेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली होती. दानवे यांच्या या टीकेचा माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी समाचार घेतला आहे

हेही वाचा...शरद पवारांची 'ती' सभा आणि उदयनराजेंसह भाजपचा पराभव

भाजप नेत्यांना काय झालंय मला माहित नाही, असा घाणेरडा राजकारण भाजपलाच लख लाभ, असं सांगत भाजप नेत्यांच्याच मतदार संघात पावसामुळे नुकसान झालं असून त्यांनी त्यांच्याच मतदार संघात दौरे तरी केले का? असा प्रश्नही खोतकर यांनी यावेळी उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांबद्दल दानवे यांनी एकेरी भाषा वापरली, हे त्यांना शोभत नसल्याचंही खोतकर म्हणाले. शिवाय मुख्यमंत्री घरात बसून काम करत नसून उद्यापासून तेही दौऱ्यावर असल्याचं खोतकर यांनी सांगितलं आहे.

नेमकं काय म्हणाले होते रावसाहेब दानवे?

राज्य संकटात असताना मुख्यमंत्री ठाकरे हे घराबाहेर पडत नसल्यानं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्यावर टीकास्त्र सोडलं.

कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नसल्याचे सांगत केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी खरमरीत टीका केली आहे. 'घरात बसून एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना खातो काय? असं दानवे म्हणाले होते.

पैठण येथील एका कार्यक्रमात बोलतांना रावसाहेब दानवे यांनी सांगितलं की, परतीच्या पावसानं मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये अक्षरश: हाहाकार उडाला आहे. शेतकर्‍यांच्या तोडांशी आलेला घास या पावसानं हिरावून नेला आहे. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. असं असताना राज्याचे मुख्यमंत्री ठाकरे हे मात्र घराबाहेर पडत नाही. कोरोना काळात देखील मुख्यमंत्री ठाकरे घराबाहेर पडलेले नाहीत.

हेही वाचा...गिरे तो भी टांग उपर! अमित शहांच्या भूमिकेवर सचिन सावंत यांची जहरी टीका

'आम्ही मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं घराच्या बाहेर निघा. तर हे म्हणतात माझं कुटुंब माझी जबाबदारी. आम्ही राज्यभर फिरलो तर आम्हाला काही झालं नाही. ह्यांना एकट्यालाच घरात बसून कोरोना खातो की काय', अशा शब्दात दानवेंनी टीका केली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: October 18, 2020, 1:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading