Home /News /maharashtra /

भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, शिवसेना नेत्याचा पलटवार

भाजपचं दूध आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा, शिवसेना नेत्याचा पलटवार

भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे..

जालना, 1 ऑगस्ट: महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुळातच शेतकरी आणि पशुपालकांच्या हिताचं काम करत असताना भाजपने दूध आंदोलन करणं म्हणजे 'चोराच्या उलट्या बोंबा' असल्याची टीका करत शिवसेना नेते व माजी दुग्धविकास मंत्री अर्जुन खोतकरांनी भाजपवर पलटवार केला आहे. हेही वाचा...स्वार्थी आणि जनमाणसाच्या विरोधातलं हे सरकार; भाजप खासदाराचा हल्लाबोल एकीकडे देशात मुबलक प्रमानात दूध उपलब्ध असताना केंद्राने दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दुसरीकडे तेच दूध आंदोलन करत आहेत. यावरून भाजपचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचं स्पष्ट होत असल्याचा आरोपही माजी दुधविकासमंत्री खोतकरांनी केला आहे. दरम्यान, राज्यभरात भाजपचे दूध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. रयत क्रांती संघटनेचे संस्थापक आमदार सदाभाऊ खोत यांच्या नेतृत्त्वाखाली सकाळी पंढरपूर येथील सांगोला चौक येथे असलेल्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी दिनी प्रतिमेस अभिवादन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत पांडुरंग यांच्या चरणी दुधाचा अभिषेक घालून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. 'महाविकास आघाडी सरकार हे मुक्याचे, बहिऱ्यांचे आणि आंधळ्यांचे असून या सरकारमधील मंत्री झपाटलेल्या सिनेमातील कलाकार असून हे आपल्याच भातावर डाळ ओढण्याचे काम करीत आहेत' अशी खरमरीत टीका सदाभाऊ खोत यांनी केली. या आंदोलनाला भाजपने पाठिंबा दिला आहे. राज्यात प्रत्येक शहरात भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करताना दिसत आहे. हेही वाचा..जालन्यात तणाव! वीरशैव समाजानं थेट ग्रामपंचायत कार्यालयाच्या आवारात केला दफनविधी या आहेत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्या... -दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव व 10 रुपये अनुदान मिळावे -दूध भुकटीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावे -शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खते, बी बियाणे मिळावे - शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी - वीज बील माफ करावी.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Shiv sena

पुढील बातम्या