Home /News /maharashtra /

Shiv Sena Uday Samant : ज्याचं बोट पकडून मोठं झाला त्याच्यावर उलटतो त्याला निष्ठावंत म्हणत नाहीत उदय सामंतांवर शिवसैनिक भडकले

Shiv Sena Uday Samant : ज्याचं बोट पकडून मोठं झाला त्याच्यावर उलटतो त्याला निष्ठावंत म्हणत नाहीत उदय सामंतांवर शिवसैनिक भडकले

मागच्या तीन दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Shiv Sena Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला

  मुंबई, 05 ऑगस्ट : मागच्या तीन दिवसांपूर्वी शिंदे गटातील आमदार उदय सामंत (Shiv Sena Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला करण्यात आला. त्यांच्या गाडीची काच देखील फोडण्यात आल्यानंतर शिवसैनिक आणि शिंदे गटातील नेत्यांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले होते. त्यानंतर पुणे पोलिसांनी आता याप्रकरणी कारवाईला सुरुवात केली आहे. यादरम्यान माझ्यावर जो भ्याड हल्ला झाला त्यातून मी वाचलो आहे. लोकशाहीत जर कुणी उठाव केला तर त्याच्यावर हल्ला करणं दुर्दैवी असल्याचं उदय सामंत यांनी म्हटले होते यावर शिवसैनिकांनीही जोरदार प्रतित्त्यर दिले आहे.

  पुण्यात उदय सामंत यांंच्या गाडीवर हल्ला झाल्यानंतर काही शिवसैनिकावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल केल्यानंतर उदय सामंत यांना डॉ. अमोल अशोक देवळेकर यांनी एक पत्र लिहिले आहे. हे पत्र व्हायरल झाले आहे.

  हे ही वाचा : आनंद दिघेंच्या पुतण्याच्या अडचणीत भर, मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स

  उदय सामंत यांना लिहलेल्या पत्रात, मा. उदयजी सामंत, आपणांस निष्ठावंत शिवसैनिकांचा शिरसाष्टांग दंडवत. उदयजी आपल्यावर काल पुण्यात जो हल्ला झाला त्याबद्दल निषेध करावा तितका थोडाच आहे. शिवसेनेचे शहराध्यक्ष संजय मोरे, पदाधिकारी सुरज लोखंडे, नगरसेवक विशाल धनवडे, आदींवर गुन्हा दाखल झाला आहे. शहरप्रमुखांसह पाच जणांना अटक देखील झाली आहे.

  आपण ईडी आणि सीबीआय पेक्षाही ज्या वायूवेगानं स्वसंरक्षणासाठी ही कामगीरी केली आहे तिची नोंद एखाद्या रेकॉर्ड बुकमध्ये करावी लागेल. आपले नेते मा. एकनाथ शिंदे व मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आगामी काळात मंत्रीमंडळ विस्तार झाल्यानंतर या महाराष्ट्रात एकुणच कशा प्रकारचा राज्यकारभार चालणार आहे याचीच एक झलक दाखवणारी ही घटना आहे.

  हे ही वाचा : सेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंना निवडणुकीत पहिलं यश; सोलापूरमधून ठाकरे गटासाठी आनंदाची बातमी

  ज्या हल्लेखोरांना आपण भ्याड हल्लेखोर संबोधले, ज्यांनी आपल्याविरुद्ध कट केला आहे, जे आपल्या जीवावर उठलेत ही लोकं नेमकी आहेत तरी कोण? यांचा मास्टरमाईंड कोण? याचा शोध केंद्रीय तपासयंत्रणा घेतीलच तत्पुर्वी आगाऊची माहिती देण्याकरीता हा पत्रप्रपंच.

  पाच जणांवर गुन्हा दाखल-

  शिवसेनेचे पुणे शहर अध्यक्ष संजय मोरे, सुरज लोखंडे, संभाजीराव थोरवे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली होती. या आरोपींवर ३५३,१२०,३०७,३३२ कलमान्वे गुन्हा दाखल केला असून तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Eknath Shinde, Ratnagiri, Shiv Sena (Political Party), Uddhav Thackeray (Politician)

  पुढील बातम्या