मुंबई, 23 मे: छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनी राज्यसभा निवडणुकीत (Rajya Sabha elections) अपक्ष उमेदवारीची घोषणा केली. शिवसेनेने संभाजीराजेंना पक्ष प्रवेश आणि उमेदवारीची ऑफर दिली. मात्र ही ऑफर संभाजीराजेंनी नाकारली आहे. संभाजीराजे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची भेट घेणार होते. मात्र ही भेट ही त्यांनी रद्द केली. यानंतर आता शिवसेना पुढचं पाऊल उचलण्याची तयारीत आहे.
संभाजीराजे छत्रपती यांच्या नावाला आता पूर्णविराम मिळाल्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना उद्या त्यांचा उमेदवार जाहीर करण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यात Corona ची चौथी लाट?, राजेश टोपेंनी दिलं स्पष्ट उत्तर
शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी ज्येष्ठ शिवसैनिकाचे नाव जाहीर करण्याची शक्यता आहे. तर येत्या 26 मे रोजी शिवसेना नेते संजय राऊत आणि उद्या जाहीर होणारे उमेदवार त्यांचा राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
दुसरीकडे संभाजीराजे यांनी शिवसेनेची ऑफर न स्वीकारल्यास अभिनेत्री उर्मिला मातोंडकर किंवा शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्याचा शिवसेना नेतृत्वाचा विचार आहे.
तसंच संभाजी राजे शिवसेना पक्षात प्रवेश करणार नाही आहेत हे आता स्पष्ट झालं आहे. संभाजीराजे यांचे चिरंजीव यांचा शिवसेना पक्ष प्रवेशासाठी विरोध असल्याची माहिती समोर आली आहे. शहाजीराजे यांचा शिवसेना पक्ष प्रवेशसाठी विरोध आहे. संभाजीराजे यांना अपक्ष उमेदवार म्हणून राज्यसभा निवडणूक लढवावी असे मत शहाजीराजे यांनी मांडले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.