आता नाशिकमध्ये युतीची जुंपली, भाजपनंतर आता सेनेचे नगरसेवकही सहलीला?

आता नाशिकमध्ये युतीची जुंपली, भाजपनंतर आता सेनेचे नगरसेवकही सहलीला?

महापौर पदाच्या 22 तारखेला होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सेनेनं आपल्या नगरसेवकांना नाशिकहून दुसरीकडे नेलं आहे.

  • Share this:

नाशिक, 16 नोव्हेंबर : भाजप पाठोपाठ शिवसेनेचे नगरसेवकदेखील बैठकीसाठी अज्ञात स्थळी रवाना झाले आहेत. महापौर पदाच्या 22 तारखेला होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमिवर सेनेनं आपल्या नगरसेवकांना नाशिकहून दुसरीकडे नेलं आहे. भाजपचे अनेक नगरसेवक आमच्यासोबत असून नाशिकचा महापौर सेनेचाच होणार असं यावेळी सेनेचे पदाधिकारी यांनी स्पष्ट केलं. त्यामुळे आता नाशिकमध्ये भाजपच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

नाशिक महापालिकेत महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीआधी घडामोडींना वेग आला आहे. निवडणुकीच्या आधी नगरसेवक फूट नये म्हणून भाजपने आपल्या नगरसेवकांच्या सहलीचा प्लॅन आखला. मात्र, यात 7 नगरसेवकांनी या सहलीत जाण्यास नकार दिल्यानं मोठी खळबळ उडाली.

राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येऊन महाशिवआघाडी सरकार स्थापन करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता नाशिक महापालिकेतही तसे संकेत मिळत आहे. येत्या 22 नोव्हेंबरला होणारी नाशिक महापौर पदाची निवडणूक सत्ताधारी भाजपनं प्रतिष्ठेची केली आहे. स्पष्ट बहुमत असलं तरी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसेनं एकत्रित येऊन भाजपला शह देण्याचं ठरवलं आहे. नगरसेवक फुटीचा धोका स्वीकारायला तयार नसल्यानं,भाजप आपल्या नगरसेवकांना सहलीला पाठवत आहे. नाशिकला हे सर्व नगरसेवक एका हॉटेलला एकत्र झाले असून अज्ञात स्थळी रवाना होणार आहे.

इतर बातम्या - SPECIAL REPORT : भेटी आणि बैठका रद्द, शिवसेनेचं नेमकं चाललंय तरी काय?

विशेष म्हणजे, भाजपला स्पष्ट बहुमत असतांनाही भाजपला जड जात आहे. कारण, शिवसेना,काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मनसे यांनी एक होऊन भाजपला कोंडीत पकडण्याची रणनीती आखली आहे. त्यामुळे भाजप कोणताही धोका पत्करायला तयार नाही. त्यामुळे आता नाशिकमधील भाजपचे नगरसेवकांच्या सहलीचा प्लॅन आखण्यात आला आहे. परंतु, यातही 7 नगरसेवकांनी सहलीला जाण्यास नकार दिला आहे.

भाजपातून राष्ट्रवादी मार्गे शिवसेनेत गेलेल्या बाळासाहेब सानप यांचे हे 7 नगरसेवक समर्थक मानले जातात. ही शिवसेनेची खेळी असल्याची चर्चा आहे. बाळासाहेब सानप हे भाजपचे पूर्व नाशिक आमदार होते. परंतु, पक्षांनं तिकीट कापल्याने त्यांनी राष्ट्रवादी उमेदवार म्हणून निवडणूक लढवली पण ते पराभूत झाले. आणि त्यानंतर अवघ्या 8 दिवसांत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सानप यांचा महापालिकेत प्रभाव आहे. त्यामुळे भाजपचे 14 नगरसेवक ते फोडू शकतात.

या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना सानप यांचा मोठा उपयोग करून घेऊ शकते. त्यात सध्या युतीमध्ये ठिणगी पडल्याने आता शिवसेना महापौर बसवण्याच्या तयारीत आहे. यासगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षनेतेपद सध्या शिवसेनेकडे आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष, मनसे यांच्या साथीनं शिवसेनेच्या हालचालींना वेग आला आहे. यात आता बाळासाहेब सानप यांची भूमिका निर्णायक असणार आहे तर गिरीश महाजन यांची कसोटी पहायला मिळणार आहे.

First published: November 16, 2019, 9:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading