जळगाव, 19 डिसेंबर : नगरपंचायत निवडणुकीच्या रणधुणाळीत शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आता नवा वाद उभा राहिला आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Minister Gulabrao Patil) यांनी बोदवड नगरपंचायत (Bodvad Nagar Panchayat) निवडणुकीसाठी आयोजित प्रचार सभेत भाषण करताना आपल्या मतदारसंघातील रस्ते हेमा मालिनींच्या गालासारखे केल्याचं म्हटलं आहे. इतकंच नाही तर हेमा मालिनीच्या गालासारखे (Hema Malini) रस्ते दिसले नाहीत तर राजीनामा देईन असंही त्यांनी म्हटलं आहे. (Shiv Sena gulabrao patil said come in my constituency roads made like hema malini cheeks)
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील?
"माझं चॅलेंज आहे 30 वर्षे आमदार राहिलेल्याला... या माझ्या धरणगावला, जर हेमा मालिनीच्या गालासारखे रस्ते नतर राजीनामा देईल." बोदवड येथील प्रचारसबेत भाषण करताना गुलाबराव पाटील यांनी हे विधान केलं आहे. त्यांनी पुढे म्हटलं, "अरे महाराष्ट्राला ज्ञान काय शिकवताय, पहिले बोदवडचा रस्ता करा." असं म्हणत गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसेंना आव्हान दिलं आहे.
वाचा : उदयनराजे संतापले, शिवेंद्रराजेंच्या टीकेला दिलं चोख प्रत्युत्तर
गुलाबराव पाटलांची मंत्रिपदावरुन हकालपट्टीची मागणी
गुलाबराव पाटील यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी म्हटलं, "शिवसनेनेच्या नेत्यांना झालंय काय? राऊतानंतर आत्ता गुलाबराव पाटील त्यांनी हेमा मालिनीबद्दल बेताल वक्तव्य केलं.गुलाबराव पाटील-रांझ्याचा पाटील वृत्ती तीच आहे. महाराजांनी त्याची पाटीलकी काढून घेतली. हे सरकार गुलाबरावाची मंत्रीपदावरून हकालपट्टी काढणार आहे का?"
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत.. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत.. पण पोलिस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही…
मी @maharashtra_hmo ना आवाहन करतीये..तात्काळ गुन्हा दाखल करा..नाहीतर गाल पाहणा-यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही.. pic.twitter.com/5wp3sI0hCN — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) December 19, 2021
शिवीगाळ करणारे संजय राऊत उजळ माथ्यानं फिरताहेत. गुलाबराव पाटलांना हेमा मालिनीचे गाल दिसताहेत. पण पोलीस यंत्रणांना यांत महिलांचा विनयभंग दिसत नाही. मी गृहमंत्र्यांना आवाहन करतेय, तात्काळ गुन्हा दाखल करा.. नाहीतर गाल पाहणाऱ्यांचे थोबाड फोडल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. असंही चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
गुलाबराव पाटलांनी साधला खडसेंवर निशाणा
जळगावमध्ये बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने प्रचार सभेत शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी 'राम तेरी गंगा मैली हो गयी' म्हणत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला आहे. त्यामुळे सभेत एकच हश्या पिकला.
बोदवड नगरपंचायत निवडणुकीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. या प्रचार सभेत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी आपल्या शैलीत तडाखेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी नाव न घेता एकनाथ खडसे यांच्यावर निशाणा साधला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Eknath khadse, Gulabrao patil, Jalgaon, Shiv sena