कणकवली, 18 जानेवारी : महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी (Maharashtra Gram Panchayat Election Results 2021) मतमोजणी सुरू आहे. आतापर्यंत हाती आलेल्या निकालात शिवसेनेनं (Shivsena) जोरदार मुसंडी मारली आहे. भाजपचे (BJP) आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनाही सेनेनं सातवे आस्मान दाखवले आहे. सोनाळी ग्रामपंचायतीवर सेनेनं भगवा फडकावला आहे.
या ना त्या मुद्यांवरून शिवसेना आणि भाजपचे नेते नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही सुपूत्र यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. पण, ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेनेनं चांगलाच वचपा काढला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सोनाळी गावात 7 जागांसाठी निवडणूक घेण्यात आली होती. 7 पैकी पाचही जागांवर शिवसेनेनं जिंकल्या आहे. 5 जागा जिंकून शिवसेनेनं विजयाचा गुलाल उधळला आहे. सोनाळी गावात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे. नितेश राणे यांना हा धक्का मानला जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत नितेश राणेंचं नाहीतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना सुद्धा पराभवाचा सामना करावा लागला आहे. चंद्रकांतदादा पाटील यांचा मुळगावी भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. शिवसेनेच्या प्रकाश अबिटकर यांनी बाजी मारली आहे. खानापुरात 6 जागा शिवसेनेकडे गेल्या आहेत. अजून तीन जागांची मतमोजणी सुरू आहे. पण शिवसेनेनं आता विजयाचा गुलाल उधळला आहे.
तर दुसरीकडे अहमदनगरमधील राहाता तालुक्यातील लोणी खुर्द गावात सत्तांतर झाले आहे. भाजपचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना इथं मोठा धक्का बसला आहे. 17 पैकी 13 जागा जिंकत परिवर्तन पॅनलने विजय मिळवला आहे. तब्बल 20 वर्षानंतर लोणी खुर्द गावात सत्तांतर झाले आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. पण, स्थानिक असलेल्या परिवर्तन पॅनलने विखे पाटलांना जोरदार धक्का दिला आहे.
तर सोलापूर जिल्ह्यात होटगी ग्रामपंचायतीत पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आहे. भाजपचे रामप्प्पा चिवडशेट्टी यांचे पॅनल विजयी झाले आहे. 15 पैकी 10 जागांवर भाजपचा विजय मिळवला आहे. इथं कॉंग्रेसला फक्त 5 जागांवर समाधान मानावे लागले आहे. कॉंग्रेसचे नेते हरीश पाटील गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Gram panchayat, Nitesh rane, नितेश राणे