सेनेच्या सरनाईकांच्या विधानानंतर भाजपच्या गोटात खलबतं; 30 तारखेला काय होणार?

सेनेच्या सरनाईकांच्या विधानानंतर भाजपच्या गोटात खलबतं; 30 तारखेला काय होणार?

"अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय लेखी स्वरूपात देत नाहीत, तोपर्यंत पुढचा निर्णय घेणार नाही", असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मातोश्रीच्या बैठकीनंतर जाहीर केलं. त्यावर भाजपच्या गोटात काय खलबतं सुरू आहेत?

  • Share this:

मुंबई, 26 ऑक्टोबर : महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेलं असलं, तरी सत्तास्थापनेचा मार्ग अजूनही मोकळा झालेला दिसत नाही. आमचं ठरलंय असं मुख्यमंत्री सांगत असले तरी शिवसेना अजूनही ठरलंय ते कागदावर यायची वाट पाहते आहे. सत्तास्थापनेत समान वाटा असेल असा 50-50 चा फॉर्म्युला ठरला आहे आणि त्यात मुख्यमंत्रिपदही येतं. "अडीच वर्षं मुख्यमंत्रिपद देण्याचा निर्णय लेखी स्वरूपात देत नाहीत, तोपर्यंत पुढचा निर्णय घेणार नाही", असं शिवसेना नेते प्रताप सरनाईक यांनी मातोश्रीच्या बैठकीनंतर जाहीर केलं. त्यामुळे भाजपची अडचण झाली आहे. आता भाजपच्या कोर्टात बॉल असून ते काय निर्णय घेतात यानुसार नव्या सरकारचं स्वरूप स्पष्ट होईल. भाजपनेही नवनिर्वाचित आमदारांची बैठक दिवाळी संपल्यानंतर लगेच म्हणजे 30 ऑक्टोबरला होणार आहे. विधिमंडळ नेता ठरवण्यासाठी ही बैठक होईल आणि 105 भाजप आमदार यात सामील असतील, असं भाजपचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. त्यामुळे सरकारचं भवितव्य 30 ऑक्टोबरलाच ठरणार हे स्पष्ट आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी 'मातोश्री'वर महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती. तासभराच्या चर्चेनंतर ही बैठक संपली. मात्र, मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आमदार आक्रमक दिसून आले. या बैठकीत युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह शिवसेनेचे 55 नवनिर्वाचित आमदार उपस्थित होते. शिवसेना आमदारांनी गटनेता आणि मुख्यमंत्रिपदासाठी सर्व अधिकार शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हेच घेतील, अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे.

वाचा - राज ठाकरेंच्या मनसेला फक्त भोपळा फुटला नाही तर मिळाला 'हा' दिलासा

मुख्यमंत्रिपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला हवा, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी शिवसेनेला सत्ता स्थापनेचा अधिकृत प्रस्ताव लेखी स्वरूपात द्यावा, ज्यामध्ये ठरल्याप्रमाणे सत्तेचे समसमान वाटप असेल. त्यानंतरच सत्ता स्थापनेसंदर्भात शिवसेना चर्चा करेल, असा आक्रमक पवित्रा सेना आमदारांनी घेतला.

दुसरीकडे भाजपनेसुद्धा त्यांच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक 30 ऑक्टोबरला बोलावली आहे. या बैठकीतच आता मुख्यमंत्रिपदाच्या वाटाघाटींची चर्चा होईल, अशी शक्यता आहे.

शिवसेनेला राष्ट्रवादी पाठिंबा देणार का अशी शक्यता वर्तवली जात होती. पण शरद पवारांच्या पक्षाने या चर्चांना पूर्णविराम देत सत्तेत रस नसल्याचं जाहीर केलं आहे. प्रफुल पटेल यांनी महायुतीला सत्तेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सत्ता मिळवण्यास उत्सुक नाही. जनतेचा कौल आम्ही मान्य केला आहे. जनतेला आम्ही विरोध पक्ष म्हणून काम करावं असं वाटत आहे.

संबंधित - मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आक्रमक.. भाजपला दिला 'हा' इशारा

त्यामुळे युतीला शुभेच्छा, असं पटेल म्हणाले आहेत.

दुसरीकडे काँग्रेस नेते मात्र शिवसेनेकडून प्रपोजल आलं तर चर्चा करू असं म्हणत आहेत. काँग्रेसची सत्तेत सहभागी व्हायची उत्सुकता विजय वडेट्टीवार यांच्या निवेगनातून स्पष्ट झाली. सध्या बॉल भाजपच्या कोर्टात आहे. आता शिवसेनेनं ठरवलं आणि आम्हाला प्रपोजल दिलं तर आम्ही त्याबाबत हायकमांडशी चर्चा करू, असं वडेट्टीवार म्हणाले आहेत.

त्यामुळे भाजप-सेना युतीला स्पष्ट बहुमत मिळालं असलं, तरी युतीतली बिघाडी किती टिकते आणि किती मिटते यावर नव्या सरकारचं भवितव्य अवलंबून आहे. 30 ऑक्टोबरला चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

--------------------------------------------

अन्य बातम्या

'सातारा विजया'नंतर दौरा रद्द का केला? स्वत: शरद पवारांनी केला खुलासा

सरकारवर वचक ठेवण्यासाठी पवारांचा मास्टरप्लान, विरोधी पक्ष नेतेपदाचे 'हे' दावेदार

शरद पवारांनी विखेंनाही दाखवले आस्मान, होमग्राऊंडमध्ये दाखवले दिवसा तारे!

'...चला मग रजा घेते', बीडमध्ये पंकजा मुंडेंची भावनिक पोस्ट व्हायरल

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 26, 2019, 4:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading