मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shiv Sena Election Commission : निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राष्ट्रवादीची जोरदार टीका, थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा

Shiv Sena Election Commission : निवडणूक आयोगाच्या निर्णयावरून राष्ट्रवादीची जोरदार टीका, थेट एकनाथ शिंदेंवर निशाणा

शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण होताच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. काल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं.

शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण होताच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. काल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं.

शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण होताच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. काल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 09 ऑक्टोंबर : शिंदे सरकारला 100 दिवस पूर्ण होताच निवडणूक आयोगाने ठाकरे गटाच्या शिवसेनेला मोठा धक्का दिला. काल झालेल्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या बैठकीत शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवण्यात आलं. यावर काल शिवसेनेसह राज्यातील विविध पक्षानी यावर प्रतिक्रीया दिल्या आहेत. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनीही ट्वीट करत हा निर्णय चुकीचा असल्याचे सांगितलं.  दरम्यान या प्रकरणाची पुढील सुनावणी 10 ऑक्टोबरला होईल, असं निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवलं आहे.

यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार म्हणाले कि, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्याचा निवडणूक आयोगाचा निकाल लोकांसाठी धक्कादायक असला तरी अनपेक्षित मात्र नक्कीच नाही. चिन्ह गोठवलं म्हणजे आपले मनसुबे साध्य होतील असा त्रयस्थांचा अंदाज असला तरी लोकांच्या मनातली निष्ठा मात्र गोठवता येणार नाही.

हे ही वाचा : आमचे चिन्ह..., उद्धव ठाकरेंच्या खास माणसाने नाव आणि फोटो केला जाहीर

दसरा मेळाव्यात दिसलेली निष्ठा निवडणुकांमध्येही निश्चित दिसेल. धनुष्यबाणाचं चिन्ह आणि शिवसेना हे नाव गोठल्याने खऱ्या शिवसैनिकाला अत्यंत वेदना होत असणार, हे मात्र खरं आहे. पण ज्यांना त्रास होत नसेल त्यांनी दुसऱ्यांची स्क्रिप्ट स्वीकारली असंच म्हणावं लागेल.

केंद्रीय निवडणूक आयोगात शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरुन गेल्या अनेक दिवसांपासून सुनावणी सुरू होती. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला कागदपत्रे सादर करण्यासाठी वेळ दिला होता. अखेर या प्रकरणी निवडणूक आयोगाची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सलग चार तास बैठक झाली. या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतला.

केंद्रीय निवडणूक आयोगाचा आदेश :

1) दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

२) दोन्ही गटांपैकी कोणालाही "धनुष्य आणि बाण" हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

3) दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील. संबंधित गट, त्यांना हवे असल्यास, त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात.

4) दोन्ही गटांना ते निवडतील अशी वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. यासाठी निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल. सध्याच्या पोटनिवडणुकासाठी त्यानुसार, दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी 01:00 पर्यंत सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

हे ही वाचा : ठाकरेंच्या वर्मावरच घाव; इतिहासातील पहिली निवडणूक शिवसेनेचं नाव अन् चिन्हाशिवाय!

(i) त्यांच्या गटांची नावे ज्याद्वारे त्यांना आयोगाने मान्यता दिली असेल आणि

यासाठी, प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या, त्यापैकी कोणीही असू शकतो

आयोगाने मंजूर केलेले आणि;

(ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

संबंधित गट. ते मध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

त्यांच्या पसंतीचा क्रम, त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

First published:

Tags: Election commission, NCP, Rohit pawar, Shiv Sena (Political Party), Shiv sena. शिवसेना