मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं उत्तर

'काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले', उद्धव ठाकरेंच्या टीकेवर भावना गवळींचं उत्तर

उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले", असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले", असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंच्या टीकेला भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले", असं भावना गवळी म्हणाल्या आहेत.

    किशोर गोमासे, वाशिम, 22 सप्टेंबर : शिवसेनेचा बुधवारी गोरेगावात गटप्रमुखांचा भव्य मेळावा झाला. या मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. या भाषणात ठाकरेंनी भाजप आणि शिंदे गटावर सडकून टीका केली. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी आपल्या भाषणात खासदार भावना गवळी यांच्यावरही टीका केली. भावना गवळी यांनी काही दिवसांपूर्वी रक्षाबंधनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींना राखी बांधली होती. त्याच गोष्टीवरुन उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला होता. ठाकरेंच्या त्या टीकेवर भावना गवळी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. "काल मी त्यांची ताई होती आज बाई झाले", असं भावना गवळी म्हणाल्या आहेत. "बहीणीवर राग काढू नये, अशी माझी विनंती आहे. हे पवित्र नातं आहे. राजकारणात राग काढायला अनेक जागा आहेत. मी मंत्र्यांना राख्या पाठवल्या, बांधल्या. मी माझ्या मतदारसंघातील सामान्य कार्यकर्ता, नागरिकापासून देशाच्या पंतप्रधानांपर्यंत राखी बांधली आहे. अटलबिहारी वाजपेयी यांनासुद्धा मी राखी बांधलेली आहे. हे भावाबहीणीचं नातं आहे. ते असंच पवित्र ठेवूयात", असं भावना गवळी म्हणाल्या. ('...तेव्हा उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना फोन केला', नारायण राणेंचा प्रहार) "काल मी उद्धव ठाकरे यांची ताई होती आज बाई झाले. रक्षाबंधन सारख्या पवित्र नात्याचं कुणीही राजकारण करू नये.  मी मागील अनेक वर्षांपासून माझ्या मतदारसंघातील एक लाखा पेक्षा जास्त भावांना राख्या पाठवते. या आधीही मी अनेक मंत्री, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनाही राखी बांधली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मला संकटकाळी मदत केली म्हणून मी त्यांची साथ दिली. उद्धव साहेब नैराश्यातून असे विधानं करत आहेत", अशी प्रतिक्रिया भावना गवळी यांनी दिली. उद्धव ठाकरेंनी नेमकी काय टीका केलेली? "ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाचाराचा आरोप केला होता त्यांना पक्षामध्ये घेऊन त्यांना क्लीन चीट करत सुटले आहात. ही अशी तुम्ही आरोप केलेली बरबटलेली लोकं बरोबर घेऊन तुम्ही भ्रष्टाचाराची लढाई करणार? अहो तुमच्या आजूबाजूला बसले आहेत त्यांना तुम्हीच भ्रष्टाचारी म्हणून बदनाम करुन टाकलेलं आहे. लगेच कुणाला तरी क्लीन चीट देऊन टाकायचं? मला पंतप्रधानांचं सुद्धा आश्चर्य वाटतं. स्वतःच्या पक्षातील माणसांनी ज्या महिला खासदारावर आरोप केले, भ्रष्टाचारी म्हणून संबोधलं, तुम्हाला सव्वा काय दीड कोटी जनतेतून हीच बहिण मिळाली राखी बांधायला?", अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली होती.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Narendra modi, Uddhav thackeray

    पुढील बातम्या