मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेला मोठा धक्का, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!

Shiv Sena Dasara Melava : शिवसेनेला मोठा धक्का, शिवतीर्थावर दसरा मेळाव्याला परवानगी नाकारली!

मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. (Shiv Sena Dasara Melava) कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. (Shiv Sena Dasara Melava) कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. (Shiv Sena Dasara Melava) कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 22 सप्टेंबर : मागच्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेला दसरा मेळाव्यावरून यंदा राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे. मागच्या काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गटाकडून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्यासाठी मुंबई महापालिकेत अर्ज केला होता. परंतु हे अर्ज मुंबई महापालिकेने ठाकरे आणि शिंदे गटाची परवानगी नाकारली आहे. (Shiv Sena Dasara Melava) कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी परवानगी नाकारत असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान यावरून शिवसेना आणि शिंदे गटातील नेत्यांकडून आरोप पत्यारोप सुरू झाले आहेत.

दसरा मेळाव्या प्रकरणी शिवसेनेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचीका दाखल करण्यात आली आहे. दरम्यान आज यावर सुनावणी होणार आहे. महापालिकेकडून शिवाजी पार्क मैदानाच्या परवानगीसाठी होणाऱ्या विलंबामुळे शिवसेनेने हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. परंतु, शिवाजी पार्क दसरा मेळाव्याला कुणालाच मिळणार नाही, असा निर्णय महापालिकेनं घेतला आहे.

हे ही वाचा : 'मिशन मुंबई'मध्ये आता पंतप्रधान मोदींची एंट्री, मुख्यमंत्री शिंदे घेणार भेट?

मिळालेल्या माहितीनुसार, शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परवानगी मुंबई महापालिकेकडून दोन्ही गटाला दिली जाणार नाही. शांतता आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नावरुन परवानगी नाकारली असल्याचे मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. महापालिकेकडून शिवसेना आणि शिंदे गट यांना परवानगी नाकारल्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. मुंबई महापालिका आयुक्त परिमंडळ 2 यांनी परवानगी नाकारल्याचे पत्र दोन्ही गटांना दिली आहे. 

काय म्हंटल आहे पत्रात…

छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता परवानगी मिळावी म्हणून आपला विनंती अर्ज कार्यालयात प्राप्त झालेला आहे. तसेच मा. खा. अनिल देसाई यांचे सुध्दा छत्रपती श्री. शिवाजी महाराज पार्क, दादर येथे दसरा मेळावा आयोजित करण्याकरिता अर्ज या कार्यालयात प्राप्त झालेले आहेत.

मला प्राप्त अधिकारांच्या अनुषंगाने एखाद्या मैदानाच्या सार्वजनिक वापरास परवानगी देणे पुर्वी पोलीस विभागाचे अभिप्राय कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने आवश्यक आहेत. त्याअनुषंगाने वरिष्ठ पोलीस निरिक्षक, शिवाजी पार्क पोलीस ठाणे, मुंबई यांचे क्र. जा.क्र.6438/2022 दि.21.09.2022 नुसार विभागाचे अभिप्राय प्राप्त झालेले असून त्यात खालील प्रमाणे नमूद केलेले आहे.

हे ही वाचा : उद्धव ठाकरेंच्या भाषणावर केशव उपाध्येंची जहरी टीका, म्हणाले पेंग्विनसेना प्रमुख

"दोन्ही परस्पर विरोधी अर्जदारांनी छत्रपती श्री शिवाजी महाराज पार्क मैदानात दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी मिळणेसाठी अर्ज केले असताना कोणत्याही एका अर्जदारास दसरा मेळावा आयोजित करण्यास परवानगी दिल्यास त्यामधून शिवाजीपार्कच्या संवेदनशील परीसरामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण होवू शकतो."

त्याअनुषंगाने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न उद्भवण्याची शक्यता असल्याने मला उप आयुक्त, (परि.-2) या पदावरील प्राप्त अधिकारांचा वापर करुन दिनांक 05.10.2022 रोजी दसरा मेळावा साजरा करण्याकरिता प्राप्त झालेला आपला अर्ज नामंजुर करण्यात येत आहे.

First published:

Tags: Cm eknath shinde, Shiv Sena (Political Party), Shiv sena dasara melava, Shivaji park, Uddhav Thackeray (Politician)