शिवसेनेतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप

शिवसेनेतर्फे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप

शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दुष्काळग्रस्त गावाचा दौरा करणार आहेत.

  • Share this:

मुंबई, 8 जून- शिवसेनेतर्फे महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यात दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं वाटप करण्यात येणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे दुष्काळग्रस्त गावाचा दौरा करणार आहेत. 'शिवसेना पक्षाकडून महाराष्ट्रातील जालना, उस्मानाबाद, ओरंगाबाद, बीड, सोलापूर, अहमदनगर, सांगली, सातारा आणि नाशिक जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त गावातील चारा छावण्यांमध्ये राहत असलेल्या शेतकऱ्यांना शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरे महाप्रसाद योजनेतून अन्नधान्याचं वाटप करण्यात येणार आहे.

धक्कादायक...कुठलीही परवानगी नसताना चीनच्या दोन बोटी दाभोळ खाडीत

महाराष्ट्रात पडलेल्या भीषण दुष्काळात शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरे उद्या, 9 जून रोजी सकाळी 10 वाजता जालना जिल्ह्यातील साळेगाव येथील चारा छावणीत उपस्थित राहणार आहेत. यावेळी शिवसेनेकडून चारा छावणीतील शेतकऱ्यांना बाळासाहेब ठाकरे महाप्रसादाचं आणि अन्नधान्याचं वाटप करण्यात येणार आहे. पाऊस पडेपर्यंत महाप्रसादाचं वाटप सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

आला रे आला...मान्सून केरळमध्ये दाखल !

शेतकऱ्यांशी संवादही साधणार..

उद्धव ठाकरे हे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधणार आहेत. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हे 9 जून रोजी सकाळी सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ, सोलापूर दक्षिण, सोलापूर उत्तर, अक्कलकोट आणि बार्शी, सांगोला, माळशिरस, माढा, मंगळवेढा आणि पंढरपूर या तालुक्यातील चारा छावण्यांना भेट देऊन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अन्नधान्याचं वाटप करणार आहेत. त्यानंतर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम तालूक्यातील हंडुग्री, वालवड, चिंचपुरढगे या दुष्काळग्रस्त गावांनाही भेट देऊन पहाणी करणार आहेत.

बाळासाहेब ठाकरेंकडे दैवी शक्ती: चंद्रकांत खैरेंचा पुन्हा अजब दावा

First published: June 8, 2019, 4:25 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading