‘खासदार दिलदार है, लेकिन कुछ चमचो से..’ सेनेच्या नगरसेवकाने खासदाराला मारला टोमणा

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवासानिमित्ताने शिवसेना नगरसेवक मल्लेश शिवान शेट्टी यांनी बॅनरवर हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवासानिमित्ताने शिवसेना नगरसेवक मल्लेश शिवान शेट्टी यांनी बॅनरवर हटके शुभेच्छा दिल्या आहेत.

  • Share this:
कल्याण, 04 जानेवारी : कल्याण डोंबिवली महापालिका निवडणूक (Kalyan Dombivali Municipal Election ) आता तोंडावर आली आहे. या निवडणुकीची घोषणा जरी झाली नसली तरी सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. या सर्व घडामोडी सुरू असताना कल्यामध्ये एक बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे.  शिवसेनेच्या (Shivsena) नगरसेवकाने 'खासदार दिलदार है, पर कुछ चमचो से लोग परेशान है' असा मजकूर छापून घरचा आहेर दिला आहे. शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे (Shrikant shinde) यांच्या वाढदिवासानिमित्ताने शिवसेना नगरसेवक मल्लेश शिवान शेट्टी यांनी बॅनरवर हटके शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छांमध्ये त्यांनी बॅनरवर श्रीकांत शिंदे यांना दिलदार म्हटलंय. मात्र, त्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांना त्यांनी चमचा असं म्हटलं आहे. त्यामुळे कल्याणमध्ये या बॅनरची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. कल्याणच्या नेतिवली चौकात हा बॅनर लावण्यात आला आहे. नेतिवली चौकात मल्लेश शेट्टी यांचं ऑफिस आहे. विशेष म्हणजे, या नेतिवली नाक्यावर मुंबई, नाशिक आणि पुण्याच्या दिशेला हजारो गाड्यांची रोजची रहदारी असते. मुख्य चौक परिसरातच बॅनर आतापर्यंत कित्येक लोकांनी हा बॅनर वाचला असेल. अनेकजणांनी या बॅनरचे उत्साहात फोटोही काढले आहेत. याशिवाय अनेकजण आताही काढत आहे. सोशल मीडियावर आता या बॅनरचा फोटो फिरायला लागला आहे.
Published by:sachin Salve
First published: