फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरेंचा 'गोलमाल' केल्याचा खळबळजनक आरोप

फडणवीस सरकारवर उद्धव ठाकरेंचा 'गोलमाल' केल्याचा खळबळजनक आरोप

शिवसेना नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारमध्ये बसूनही रस्त्यावर का उतरलो याचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं.

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर : शिवसेना नेते आणि 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी फडणवीस सरकारमध्ये बसूनही रस्त्यावर का उतरलो याचं पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं. सरकारविरोधात रस्त्यावर उतरावं लागलं कारण यंत्रणेत गोलमाल आहे, असा खळबळजनक आरोप शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांच्या संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीचा पहिला भाग नुकताच प्रसिद्ध झाला होता. त्यावेळी उद्धव यांनी युतीत शिवसेनेनं तडजोड केली आहे का, यावर भाष्य केलं होतं. महाराष्ट्राच्या भल्यासाठी शिवसेनेने तडजोड केली असा खुलासा उद्धव ठाकरे यांनी केला. सरकारच्या पीक विमा योजनेत गडबड झाली, असा स्पष्ट आरोप उद्धव यांनी या मुलाखतीत केला. शेतकऱ्यांना भरपाई मिळाली नाही, कारण तिथे गोलमाल झाला, असं त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

वाचा  - बीड दसरा मेळावा: तुम्ही 300 जागा दिल्या मोदींनी 370 हटवले- अमित शहा

शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरावं लागलं, असं सांगताना उद्धव म्हणाले, "प्रधानमंत्री फसल विमा योजना चांगला आहे, पण योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेत गोलमाल आहे." सरकार गोलमाल थांबवू शकलं नाही का, यावर ते म्हणाले, "अपेक्षेप्रमाणे घडलं नाही. त्यासाठी रस्त्यावर उतरावं लागलं."

नक्की काय गोलमाल झाला हे स्पष्ट करताना उद्धव यांनी सांगितलं की, "देशाच्या कृषिमंत्र्यांनीसुद्धा ते मान्य आहे की, गडबड आहे. मुख्यमंत्र्यांचंसुद्धा स्टेटेमेंट आहे. मी त्याच्याकडे लक्ष वेधलं. या योजनेत दोन टक्के हिस्सा शेतकरी देतो आणि उरलेलं केंद्र आणि राज्य सरकार देतं. ज्या कंपन्या यासाठी सुविधा देत आहेत, त्यांचा एकही पैसा यात गुंतवता जात असेल असं मला वाटत नाही. शेतकऱ्यांकडून हप्ता घेताना या कंपन्यांचे दलला फिरतात, पण जेव्हा प्रत्यक्ष नुकसानभरपाई देण्याची वेळ येते, तेव्हा गावात कुणी जात नाही.

'पुतळा जाळू नका तर...', गुजरातच्या दुर्योधनाचा भाऊ रावण काय म्हणतोय पाहा

गावात तर सोडाच पण तालुक्यात, जिल्ह्यात कंपन्यांची ऑफिसेससुद्धा नाहीत. ही मोठी त्रुटी योजनेत आहे. "

विरोधकांनी पीक विमा योजनेबद्दल ब्रसुद्धा काढला नाही. केंद्र सरकार आणि मुख्यमंत्र्यांनासुद्धा आता कळलं आहे की, यात सुधारणा केली पाहिजे, असं उद्धव म्हणाले.

ईडीचा दबाव आहे का?

'तुमच्यावर सुद्धा ईडाचा दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे, त्याबद्दल काय सांगाल?', असा प्रश्न विचारल्यानंतर उद्धव ठाकरे म्हणाले की, 'काय ते ईडी? मला नका सांगू त्या गोष्टी. कर नाही त्याला डर कशाला? मी लढणाऱ्या पित्याचा लढणार पुत्र आहे. माझे आजोबासुद्धा योद्धा होते. मी घाबरत नाही. उगाच भलतेसलते प्रयोग करू नका.' ईडीच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरे यांनी आक्रमक उत्तर देत इशाराही दिला आहे.

युतीतील तडजोडीवर भाष्य

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला सांभाळून घ्या अशी विनंती केली होती त्यामुळे तडजोड केली असंही त्यांनी स्पष्ट केलं.

इतर संबंधित बातम्या

उद्धव ठाकरेंवरही ED चा दबाव? पहिल्यांदाच दिलं उत्तर

वाचा - अमित शहांसोबत पंकजा मुंडेंचं शक्तिप्रदर्शन, लाखो वंचितांच्या शक्तिकेंद्राची कथा!

खळबळजनक! भाजपमधून बंडखोरी केलेल्या उमेदवाराच्या आईला धमकी

भोकरदनमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का, तालुकाध्यक्षाने सोडली साथ

Published by: Arundhati Ranade Joshi
First published: October 8, 2019, 2:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading