मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'हिंमत असेल तर...', उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना अतिशय आक्रमक शब्दांमध्ये आव्हान

'हिंमत असेल तर...', उद्धव ठाकरेंचं अमित शाहांना अतिशय आक्रमक शब्दांमध्ये आव्हान

"हिंमत असेल तर समोर या. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. महिन्याभरात निवडणुका लावून दाखवा", असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिलं.

"हिंमत असेल तर समोर या. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. महिन्याभरात निवडणुका लावून दाखवा", असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिलं.

"हिंमत असेल तर समोर या. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. महिन्याभरात निवडणुका लावून दाखवा", असं आव्हान उद्धव ठाकरेंनी अमित शाहांना दिलं.

  • Published by:  Chetan Patil
मुंबई, 21 सप्टेंबर : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज गोरेगावात आपल्या पक्षाच्या सर्व गटप्रमुख आणि कार्यकर्त्यांना आगामी महापालिका निवडणुकीसाठी सज्ज होण्याचं आवाहन केलं. उद्धव ठाकरेंची गोरेगावात आज भव्य सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि भाजपवर सडकून टीका केली. ठाकरेंनी यावेळी अत्यंत आक्रमक भाषण केलं. यावेळी त्यांनी भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना जाहीर आव्हान दिलं. "हिंमत असेल तर समोर या. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. महिन्याभरात निवडणुका लावून दाखवा", असं आव्हान उद्धव ठाकरेंनी दिलं. "तुम्ही हिंदूंमध्ये मराठी-अमराठी असा भेदभाव करुन बघा. आज अमराठी जनतादेखील आमच्यासोबत आहे. गुजराती, उत्तर प्रदेशचे सगळे आहेत. कारण कोरोना काळात मुख्यमंत्री म्हणून काम करताना मी सर्वांचे प्राण वाचवले आहेत. १९९२-९३ साली देखील देशद्रोह्यांनी थैमान घातलं होतं. त्यावेळीदेखील शिवसैनिकांनी दर्ग्याचं देखील संरक्षण केलं आहे. हीच तर आमच्या शिवाजी महाराजांची आणि माझ्या आजोबांची शिकवण आहे. केवळ मतं मिळवायची म्हणून नाही", असं उद्धव ठाकरे म्हणाले. ('महाराष्ट्रात बाप पळवणारी टोळी, मुंबईचे लचके तोडू देणार नाही', उद्धव ठाकरेंच्या आक्रमक भाषणातील महत्त्वाचे मुद्दे) "कधीही शिवसेना प्रमुखांनी सगळे मुसलमान गद्दार आहेत, असं म्हटलेलं नाही. शिवसेना आज म्हणजे काय, शिवसेनेचं हिंदुत्व म्हणजे काय ते त्यांनादेखील समजत आहे. त्यामुळे अमराठी, गुजरातीसुद्धा आमच्यासोबत आहेत. मराठी तर आहेतच. पण तुमची जी शाहानीती आहे यावर मी दसरा मेळाव्यात बोलणार आहे. तोडा फोडो राज्य करा ही निती महाराष्ट्रात शक्य नाही. हिंदू-मुसलमान भेदभाव शक्य नाही. म्हणून मी अमित शाहांना आव्हान देतोय. तुमचे चेले-चपाटे इथे बसले आहेत ना, त्यांना सांगा, हिंमत असेल तर मुंबई महापालिका निवडणुका महिन्याभरात घेवून दाखवा. त्याहून पुढे हिंमत असेल तर त्याच वेळेला विधानसभेची निवडणूक घेवून दाखवा. कुस्ती आम्हालासुद्धा येते. आमची तर तीच परंपरा आहे. बघू कोणाच्या पाठीला कोण माती लावतं ते. हिंमत असेल तर या समोर", असं चॅलेंज उद्धव ठाकरेंनी अमित शाह यांना दिलं.
First published:

Tags: Uddhav thackeray

पुढील बातम्या