शिवसेनेचं खासदारांना नवं फर्मान, भाजपविरोधात न बोलण्याची ताकीद!

शिवसेनेचं खासदारांना नवं फर्मान, भाजपविरोधात न बोलण्याची ताकीद!

भाजपच्या नेत्यांविरोधात आणि पक्षाविरोधात काहीही बोलायचं नाही अशा सूचना शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये टीकसत्र सुरू आहे. यावर आता शिवसेनेकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे.

  • Share this:

पायल मेहता, प्रतिनिधी

नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : राज्यात सत्ता स्थापनेवरून प्रत्येक क्षणाला नवीन घडामोडी घटत असताना आता शिवसेनेकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे. भाजपच्या नेत्यांविरोधात आणि पक्षाविरोधात काहीही बोलायचं नाही अशा सूचना शिवसेनेच्या नेत्यांना देण्यात आल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये दोन्ही पक्षांमध्ये टीकासत्र सुरू आहे. यावर आता शिवसेनेकडून सावध भूमिका घेण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवसेनेकडून भाजपविरोधात काहीही न बोलण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत.

खरंतर, भाजपशी काडीमोड घेतल्यानंतर आता शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सत्ता स्थापन करण्याच्या तयारीत आहे. पण यातही आघाडीकडून काही स्पष्ट भूमिका घेण्यात येत नाहीये. त्यामुळे शिवसेनेचं इकडे आड तिकडे विहिर अशी गत झाली आहे. यावर आता शिवसेनेनं सावध पवित्रा घेतला असल्याच्या चर्चा आहेत.

इतर बातम्या - VIDEO: काँग्रेस आमदारावर लग्नाच्या कार्यक्रमात गळ्यावर चाकूने वार, प्रकृती गंभीर

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यात महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये राज्यातील सत्ता पेचावर चर्चा होईल आणि तोडगा निघेल अशी आशा असताना बैठकीत शिवसेनेविषयी कोणतीही चर्चा झाली नसल्याची माहिती शरद पवार यांनी पत्रकार परिषदेतून दिली. त्यामुळे शिवसेनेला अद्यापही आघाडीकडून ठाम पाठिंबा नाही. त्यात भाजपशीही काडीमोड झाली. त्यामुळे आता भाजपविरोधात काहीही न बोलण्याचं फर्मान शिवसेनेकडून काढण्यात आलं आहे.

इतर बातम्या - मुंबई: मॉर्निंग वॉकला गेलेल्या अल्पवयीन मुलीचं अपहरण, 12 तास सामूहिक बलात्कार

एकीकडे असं असताना दुसरीकडे शिवसेनेला पाठिंबा न देण्याचं पत्रक जमियत उलेमा-ए-हिंदने सोनिया गांधी यांना पाठवलं. त्यामुळे सेनेसोबत न जाण्यासाठी कुठेतरी सोनिया गांधी यांच्यावर दबाव टाकण्यात येत असल्याच्या चर्चा आहेत. त्यात बहुमत असणाऱ्या भाजप आणि शिवसेनेनं सरकार स्थापन का नाही केलं असंही शरद पवार म्हणाले. त्यामुळे आता राजकीय सत्ता पेच वाढला आहे.

मोठी बातमी - सोनिया गांधींच्या बैठकीनंतर पवारांनी पुन्हा सस्पेन्स वाढवला, शिवसेनेवर म्हणाले..

Published by: Renuka Dhaybar
First published: November 18, 2019, 8:55 PM IST

ताज्या बातम्या