सिंधुदुर्ग, 11 जुलै : नारायण राणे (Narayan Rane) यांनी शिवसेनेला (Shiv Sena) जय महाराष्ट्र केला तेव्हापासून शिवसेना नेते आणि राणे कुटुंबात आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्याचं आपण अनेकदा अनुभवलं आहे. मात्र, आज कोकणात एक वेगळेच चित्र सर्वांना पहायला मिळालं. वेगुर्ले नगरपरिषदेच्या (Vengurla Nagar Parishad) वेगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने आज काही वेगळं घडलं. चक्क शिवसेना आणि भाजप नेते एकाच व्यासपीठावर (Shiv Sena Bjp leaders on one stage) आल्याचं पहायला मिळालं. यावेळी नितेश राणे (Nitesh Rane) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा युती होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
वेगुर्ले नगरपरिषदेच्या वेगुर्ले सागररत्न मत्य बाजारपेठे लोकार्पणाच्या निमित्ताने आज राजकीय वेगळा अनुभव पहायला मिळाला. या निमित्ताने शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी एकाच व्यासपीठावर पहायला मिळाले. शिवसेना खासदार आणि शिवसेना सचिव विनायक राऊत, शिवसेना आमदार दिपक केसरकर आणि भाजपचे आमदार रविंद्र चव्हाण, भाजपचे आमदार नितेश राणे एकाच व्यासपीठावर होते. राणे आणि सेना यांच्यातील राजकीय वैर नेहमी पहायला मिळते मात्र या वेळी चित्र उलट होते.
राज्यात मध्यावधी निवडणुकांबाबत देवेंद्र फडणवीसांनी केलं मोठं वक्तव्य
... तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र येऊ - नितेश राणे
नितेश राणे आणि विनायक राऊत हे कानात हितगुज करताना पहायला मिळाले. नितेश राणेंनी तर जाहीर भाषणातून सेना आणि भाजपच्या युतीवर भाष्य केले. हल्ली युतीची चर्चा बंद होती पण हे चित्र पाहिल्यानंतर युतीची चर्चा करणाऱ्यांना चांगली झोप लागेल, या चित्रामुळे युतीची चर्चा नक्की रंगेल. वरिष्ठांनी आदेश दिला तर आम्ही दोन्ही पक्ष एकत्र मिळून काम करू असं वेगळे राजकीय संकेत भाजप आमदार नितेश राणेंनी दिलेत.
नितेश राणे हे भाषण संपवून व्यासपीठाच्या खुर्चीवर विराजमान झाले. त्यावेळी शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नितेश राणे यांची पाठ थोपटली. खासदार विनायक राऊत यांनी जाहीर भाषणात आपण आणि नितेश राणे मित्र असल्याचं बोलून दाखवलं. मी नितेश राणे यांचे अभिनंदन करतो. अभिनंदन करायला सुद्धा मोठं मन लागतं असं सांगत खासदार विनायक राऊत यांनी कोकणातले राजकीय नेते विकासकामांसाठी एकत्र येतात याची झलक दाखवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Nitesh rane, Shiv sena