Home /News /maharashtra /

मुंबई महापालिकेत राडा! शिवसेनेच्या विजयावर आक्षेप घेत भाजपनं घातला गोंधळ

मुंबई महापालिकेत राडा! शिवसेनेच्या विजयावर आक्षेप घेत भाजपनं घातला गोंधळ

निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नाही, असा आरोप भाजपनं केला आहे.

मुंबई, 16 ऑक्टोबर: प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने ऐनवेळी माघार घेतली. त्यामुळे शिवसेना आणि भाजपच्या दृष्टीनं ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. सर्वाधिक संख्याबळ असलेला दुसरा मोठा पक्ष भाजपनं तीन प्रभाग समित्यांवर वर्चस्व मिळवलं तर, पाच प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदी शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. उर्वरित नऊ प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेना-भाजपमध्ये चुरस निर्माण झाली आहे. हेही वाचा....मुंबई Local संदर्भात मोठा निर्णय : QR कोडशिवाय महिलांना करता येईल लोकल प्रवास एस अँड टी प्रभाग समितीच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत दीपमाला बढे आणि जागृती पाटील आमने-सामने होत्या. मात्र, भाजपचं एक मत अवैध ठरवण्यात आले. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या सभागृहात राडा सुरू झाला आहे. शिवसेनेनं प्रभाग समिती जिंकली आहे, मात्र, निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता नाही, असा आरोप भाजपनं केला आहे. भाजप नगरसेवक आक्रमक झाले असून त्यांनी सभागृहात गदारोळ सुरू केला आहे. आक्रमक नगरसेवकांनी नव्या प्रभाग समिती अध्यक्षांना आणि चिटणीसांना घेराव घातला आहे. अवैध ठरवण्यात आलेल्या नगरसेवकांचं नाव सांगितलं जात नाही, किंवा अवैध असण्याचं कारणही सांगितलं जात नाही आहे. त्यामुळे भाजप आक्रमक झाला आहे. शिवसेनेचं कुरघोडीचं राजकारण! मुंबई महापालिकेत कुरघोडी करत शिवसेनेनं 12 प्रभाग समिती आपल्या ताब्यात घेतल्या आहेत. गेल्यावेळी शिवसेनेकडे आठ प्रभाग समित्या होत्या तर भाजपकडे नऊ प्रभाग समित्या होत्या. या वर्षीच्या निवडणुकांमध्ये मात्र काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने चार प्रभाग समित्या जास्त मिळवून एकूण 12 प्रभाग समित्यांवर आपला झेंडा फडकावला आहे. मुख्य म्हणजे भाजपचे खासदार मनोज कोटक हे ज्या प्रभाग समितीचे सदस्य आहे. तिथल्या निवडणुकीत समसमान मते पडण्याची शक्यता होती. अशावेळी चिठ्ठीद्वारे प्रभाग समिती अध्यक्ष निवडला गेला असता परंतु निवडणुकी भाजपचे एक मत अवैध ठरवण्यात आलं. यावर भाजपने आक्षेप घेतला परंतु त्यांना ते दाखवण्यात आले नाही. त्यामुळे शिवसेनेने फसवणूक करून प्रभाग समिती जास्त मिळवली, असा आक्षेप भाजपने घेतला आहे. दरम्यान, एकूण 17 प्रभाग समित्यांपैकी सहा समित्यांच्या अध्यक्षपदाची निवडणूक बुधवारी पार पडली. यापैकी 'जी/दक्षिण' प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी शिवसेनेचे दत्ता नरवणकर, 'जी/उत्तर' प्रभाग समितीमध्ये शिवसेनेचे जगदीश मक्कुनी थैवलपिल,'सी' आणि 'डी' प्रभागात भाजपच्या मीनल पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. तर 'ए', 'बी' आणि 'ई' प्रभागासाठी झालेल्या निवडणुकीत शिवसेनेचे रमाकांत रहाटे यांनी भाजपच्या मकरंद नार्वेकर यांचा पाच मतांनी पराभव केला. या प्रभागात बिनविरोध पी/ दक्षिण- भार्गव पटेल (भाजप) एम / पश्चिम- महादेव शिवगण (भाजप) एम / पूर्व- विठ्ठल लोकरे (शिवसेना) एल-आकांशा शेट्ये (शिवसेना) अखेर चहल यांनी मागितली माफी! दरम्यान, मुंबई महापालिकेत दोन दिवसांपूर्वी सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये खडाजंगी पाहण्यास मिळाली. शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप केला आहे. अखेर या वादावर 'मला लहान भाऊ समजून माफ करा' असं म्हणत चहल यांनी माफी मागितली आहे. प्रभाग समित्यांची निवडणूक असल्यानं महापौर किशोरी पेडणेकर, सभागृह नेत्या विशाखा राऊत आणि शिवसेनेचे नगरसेवक सभागृहात पोहोचले होते. मात्र, कोणतेही अधिकारी हजर नव्हते. त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आयुक्त इकबाल चहल यांना फोन केले होते. पण, तुम्हाला थोडे थांबता येत नाही का? तुम्ही पॅनिक कशाला होता? अशा भाषेत चहल यांनी उत्तर दिले होते, असा आरोप पेडणेकर यांनी केला. त्यानंतर सेनेच्या नेत्यांनी पालिकेत ठिय्या आंदोलन सुरू केले. आयुक्त स्वत: ला काय समजता, जर पदभार सांभाळता येत नसेल तर राज्य शासनात परत जावे, अशी टीका महापौरांनी केली. हेही वाचा...मुलाचे छंद जोपासायचे सोडून महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांकडे लक्ष द्या, निलेश राणे तर, आपण अनेक वेळा कामाच्या निमित्ताने चहल यांना फोन केले. पण फोन करूनही मी कामात आहे, कोविड रुग्णालयांना भेट देत आहे, तुम्हाला संयम नाही का? अशा भाषेत उद्धट उत्तरं देतात, असा आरोप राऊत यांनी केला होता. या वादानंतर आयुक्त इकबाल चहल यांनी महापौर आणि सभागृह नेत्या विशाखा राऊत यांना फोन केला. मला लहान भाऊ समजू माफ करावे, असं म्हणत चहल यांनी विनंती केली. चहल यांनी माफी मागितल्यामुळे महापौर पेडणेकर आणि विशाखा राऊत यांनीही नरमाईची भूमिका घेतली. 'लहान भावानंही इथून पुढे मोठ्या बहिणींचं ऐकावं' असं सांगत महापौर आणि विशाखा राऊत यांच्याकडूनही वादावर पडदा पडला.

तुमच्या शहरातून (मुंबई)

Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BMC, Maharashtra, Mumbai

पुढील बातम्या