नाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार?

नाणार अधिसूचना रद्द करण्यावरून आजची मंत्रिमंडळ बैठक गाजणार?

नाणार प्रकल्पांवरून भाजपा शिवसेनेत वाढलेल्या तणाव पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळ बैठक होणार आहे.

  • Share this:

24 एप्रिल : आज सकाळी ११ वाजता मंत्रालयात मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. नाणार प्रकल्पांवरून भाजपा शिवसेनेत वाढलेल्या तणाव पार्श्वभूमिवर मंत्रीमंडळ बैठक होणार आहे. नाणार प्रकल्प अधिसूचना रद्द केल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलीय. त्यानंतर काही वेळातच मुख्यमंत्री देवेद्र फडवणीस यांनी अधिसूचना रद्द केली नाही.

दरम्यान, अधिसूचना रद्द करण्याचा अधिकार देसाई यांना नसल्याचा खुलासा करून मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेची गोची केली. नाणार प्रकल्पवरून शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सीएम फडवणीस यांच्यावर ही जोरदार टीका केलीय.

या सर्व पार्श्वभूमिवर शिवसेना भाजप वाद पुन्हा एकदा समोर आलाय. त्यातच आता कॅबिनेट मिटींग असून या बैठकीत सेनेचे मंत्री काय भूमिका घेणार, उद्योग मंत्री सुभाष देसाई कॅबिनेटमध्ये काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागलंय. सेना-भाजपा वादाचे पडसाद कॅबिनेटमध्ये दिसणार आहे.

 

First published: April 24, 2018, 9:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading