भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली पण महायुतीत वाढली धुसपूस!

शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो. मात्र युतीकडून जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये आम्हाला एकही जागा सोडलेली नाही.

शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो. मात्र युतीकडून जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये आम्हाला एकही जागा सोडलेली नाही.

  • Share this:
    प्रफुल्ल साळुंखे , प्रतिनिधी  मुंबई, 22 फेब्रुवारी : भाजप आणि शिवसेनेमध्ये युती झाली पण महायुतीत धुसपूस वाढली आहे. युतीच्या नादात आम्हाला वाऱ्यावर सोडलं का ? अशी भावना भाजपच्या घटक पक्षात निर्माण झाली आहे. 'शिवसेना भाजप युती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो. मात्र युतीकडून जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये आम्हाला एकही जागा सोडलेली नाही. त्यामुळे मी स्वतः नाराज असून संपूर्ण रिपब्लिकन जनतेतही प्रचंड नाराजी आहे,' असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. रामदास आठवले यांच्या नंतर कृषीराज्यमंत्री सदाभाऊ खोत भाजपवर नाराज आहेत. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ युतीत शिवसेनेला जाणार असल्याच्या चर्चेने सदाभाऊ नाराज आहेत. कारण हातकणंगले मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी सदाभाऊ खोत उत्सुक आहे. त्यातही भाजपनं लोकसभा आणि विधानसभेसाठी फक्त शिवसेनेशी चर्चा केल्याने घटक पक्ष नाराज आहेत. त्यामुळे 'भाजपनं आपल्याला कात्रजचा घाट दाखवला' अशी टीकाही सदाभाऊ खोत यांनी केली. दरम्यान, युती झाली पण महायुतीत आमचं स्थान काय ? असा सवाल शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी उपस्थित केला आहे. 'भाजपला आम्ही अडचणीच्या वेळी मदत केली. पण भाजपनं युती करताना विश्वासात घ्यायला हवं होतं. आम्ही शिवसंग्रामला तीन जागा मागितल्या आहेत. त्यामुळे याबाबत भाजपने बैठक घ्यावी' असंही विनायक मेटे म्हणाले आहेत. शिवसेनेसोबत काडीमोड झाल्यानंतर रिपाइंचे आठवले, रासपचे महादेव जानकर, स्वाभिमानीचे राजू शेट्टी आताचे सदाभाऊ खोत, शिवसंग्रामचे विनायक मेटे यांनी भाजपला साथ दिली. आता मात्र भाजप मित्रपक्षांना विचारे ना असा वारंवार आरोप होत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपने मित्रपक्षाला प्रत्येकी एक जागा सोडली होती. पण या निवडणुकीत साध्या चर्चेला बोलावलं नसल्याचा आरोप घटकपक्षाकडून होत आहे. मित्रपक्षांनी मागितलेल्या जागा रासप - बारामती म्हाडा रिपाई - दक्षिण मध्य मुंबई, सातारा शिवसंग्राम - अकोला, बीड रयत क्रांती संघटना - हातकणंगले जागावाटपमध्ये हे सर्व भाजपचे घटकपक्ष आहेत. हे पाहता जागावाटप भाजपच्या कोट्यातून व्हावे ही भूमिका शिवसेना उपस्थित करू शकते. त्यामुळे शिवसेनेसोबत युती झाल्यानंतर भाजप मित्रपक्षांना जागा सोडेल की विधानसभेच्या आश्वासनावर बोळवन करेल? तर यावर मित्रपक्ष आक्रमक होतात की तालावर म्यान करतात हे आगामी काळ ठरवेल. VIDEO : बाळासह आई गाडीतून पडली, ट्रकखाली येण्यापासून थोडक्यात बचावला चिमुकला
    First published: