भाजप सेना युतीवर शिक्कामोर्तब होणार; नेमका काय आहे फॉर्म्युला आणि कुणी केलाय त्याग?

भाजप सेना युतीवर शिक्कामोर्तब होणार; नेमका काय आहे फॉर्म्युला आणि कुणी केलाय त्याग?

गेले अनेक दिवस होणार.. नाही असं करत भाजप- शिवसेना युतीची नुसती चर्चाच सुरू होती. आमचं ठरलंय असं म्हणताना फॉर्म्युला काय हे मात्र गुलदस्त्यातच होतं.

  • Share this:

मुंबई 30 सप्टेंबर : गेले अनेक दिवस होणार.. नाही असं करत भाजप- शिवसेना युतीची नुसती चर्चाच सुरू होती. आमचं ठरलंय असं म्हणताना फॉर्म्युला काय हे मात्र गुलदस्त्यातच होतं. आता थोड्याच वेळात युतीची घोषणा होईल. सेनेच्या मेळाव्यात युतीची घोषणा होणार अशी चर्चा आहे. चंद्रकांत पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, युतीमध्ये कुठलेही मतभेद नाहीत. शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांचे उच्चपदस्थ युतीच्या फॉर्म्युलावर आणि काही जागांच्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते. आता मात्र उमेदवारी दाखल करायला अवघे चार दिवस राहिलेले असताना युतीचे नेते एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन युतीची औपचारिक घोषणा करणार आहेत. भाजप नेते शहनवाझ हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कुठल्याही क्षणी युतीची घोषणा होऊ शकते.

युतीचा अंतिम फॉर्म्युला!

भाजप- 144

शिवसेना- 126

मित्रपक्ष- 18

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहेत. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतर युतीचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळल्याचं वृत्त आलं होतं. मात्र भाजपचे महाराष्ट्रातलं नेतृत्व युतीसाठी आग्रही असल्याचं शेवटच्या क्षणी जाणवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 125 जागा सेनेला सोडण्याची तयारी दाखवली आहे.

हे वाचा - प्रकाश आंबेडकरांच्या 'या' निर्णयामुळे 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ची चिंता वाढणार

युतीचं घोडं अडलं होतं प्रामुख्याने चार जागांवर. त्यामध्ये विदर्भातले 2 आणि नवी मुंबईतला एक आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक मतदारसंघ होता.

हे वाचा -साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात लढणार नाहीत!

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळी (वर्धा), सावनेर (नागपूर), माण- खटाव (सातारा) आणि बेलापूर (नवी मुंबई) या चार जागांवर सर्वाधिक चर्चा झाली. यावरचा दावा दोन्ही पक्ष सोडण्यास तयार नव्हते. त्यावर तोडगा निघाला त्यानंतरच युतीचा मार्ग मोकळा झाला. बडनेऱ्याच्या जागेचा घोळही कायम होता. तिथे रवी राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक करायच्या तयारीत होते. पण जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेल्याने राणांची पंचाईत झाली आहे. ते पुन्हा राष्ट्रावादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

-----------------------------------------------

Special Report- गौतम बुद्ध उपयोगाचा नाही- संभाजी भिडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 05:31 PM IST

ताज्या बातम्या