अखेर महायुतीची घोषणा 'कागदावर'च आली; जागावाटप फॉर्म्युला गुलदस्त्यातच

गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं चर्चेचं गाडं अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून मार्गी लागलं. काय आहे या पत्रकात?

News18 Lokmat | Updated On: Sep 30, 2019 08:09 PM IST

अखेर महायुतीची घोषणा 'कागदावर'च आली; जागावाटप फॉर्म्युला गुलदस्त्यातच

मुंबई 30 सप्टेंबर : गेले अनेक दिवस अडलेलं महायुतीचं चर्चेचं गाडं अखेर औपचारिकपणे एक छोटं पत्रक काढून मार्गी लागलं. जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे मात्र अजून गुलदस्त्यातच आहे. कारण युतीची घोषणा फक्त पत्रक काढून करण्यात आली आहे. भाजप आणि शिवसेनेनं उमेदवारांना एबी फॉर्म द्यायला सुरुवातही केली होती, पण घोषणा व्हायची बाकी होती. ती सोमवारी संध्याकाळी निव्वळ पत्रक काढून करण्यात आली. संयुक्त पत्रकार परिषद घेण्याचं मात्र दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी टाळलं. त्यामुळे कोणाला कुठली जागा मिळणार, जागावाटपाचा फॉर्म्युला काय हे स्पष्ट झालेलं नाही.

शिवसेनेचे सुभाष देसाई आणि भाजपचे चंद्रकांत पाटील यांच्या सहीने हे महायुतीची घोषणा करणारं पत्रक प्रसिद्ध करण्यात आलं आहे. भाजप, सेना. रिपाई, रासप, शिवसंग्राम आणि रयतक्रांती यांची ही महायुती असेल, असं या पत्रकात जाहीर करण्यात आलं आहे. युतीचा निर्णय एकमताने घेण्यात आल्याचं म्हटलं आहे. कोण किती जागा लढवणार हे लवकरच जाहीर करण्यात होईल, असाही उल्लेख या निवेदनात आहे.

सुरुवातीला आदित्य ठाकरेंनी शिवसेनेच्या विजय संकल्प मेळाव्यात आपण स्वतः निवडणूक लढवण्याची घोषणा केली. पण त्या वेळी युतीची घोषणा झाली नाही. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. पण जागावाटपाचा निर्णय मी जाहीर करणार नाही, असं सांगितलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपुरात होते. त्यांनी तिथे पत्रकार परिषद निश्चित असं सांगितलं. पण जागावाटपाविषयी काही बोलले नाहीत.

विधानसभा निवडणूक : भारताच्या ‘या’ दोन स्टार खेळाडूंना भाजपकडून तिकीट!

Loading...

गेले अनेक दिवस होणार.. नाही असं करत भाजप- शिवसेना युतीची नुसती चर्चाच सुरू होती. आमचं ठरलंय असं म्हणताना फॉर्म्युला काय हे मात्र गुलदस्त्यातच होतं. आता युतीची घोषणा झालेली असली तरी हे उघड झालेलं नाही.

शिवसेना आणि भाजप दोन्ही पक्षांचे उच्चपदस्थ युतीच्या फॉर्म्युलावर आणि काही जागांच्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत होते.

हेही वाचा - उपमुख्यमंत्रीपदाबाबत ठरलं का? चंद्रकांत पाटील यांनी दिलं हे उत्तर!

आता मात्र उमेदवारी दाखल करायला अवघे चार दिवस राहिलेले असताना युतीचे नेते एकत्र प्रेस कॉन्फरन्स घेऊन युतीची औपचारिक घोषणा करणार आहेत. भाजप नेते शहनवाझ हुसेन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कुठल्याही क्षणी युतीची घोषणा होऊ शकते.

युतीचा अंतिम फॉर्म्युला हा असू शकतो!

भाजप- 144

शिवसेना- 126

मित्रपक्ष- 18

हे वाचा - काट्याने काटा काढायचा असतो, फोडाफोडी पुढे होईल, अजित पवारांचा भाजपला इशारा

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर करण्याची वेळ आली तरी शिवसेना-भाजपमध्ये जागावाटपावरून अजून वाटाघाटी सुरूच आहेत. दिल्लीत भाजपच्या मुख्यालयात केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली आणि त्यानंतर युतीचा मार्ग मोकळा झाला. शिवसेनेने केलेली 126 जागांची मागणी भाजपने फेटाळल्याचं वृत्त आलं होतं. मात्र भाजपचे महाराष्ट्रातलं नेतृत्व युतीसाठी आग्रही असल्याचं शेवटच्या क्षणी जाणवलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 125 जागा सेनेला सोडण्याची तयारी दाखवली आहे. हे वाचा - प्रकाश आंबेडकरांच्या 'या' निर्णयामुळे 'काँग्रेस-राष्ट्रवादी'ची चिंता वाढणार युतीचं घोडं अडलं होतं प्रामुख्याने चार जागांवर. त्यामध्ये विदर्भातले 2 आणि नवी मुंबईतला एक आणि पश्चिम महाराष्ट्रातला एक मतदारसंघ होता. हे वाचा -साताऱ्याच्या राजकारणात ट्विस्ट, पृथ्वीराज चव्हाण उदयनराजेंविरोधात लढणार नाहीत! सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार देवळी (वर्धा), सावनेर (नागपूर), माण- खटाव (सातारा) आणि बेलापूर (नवी मुंबई) या चार जागांवर सर्वाधिक चर्चा झाली. यावरचा दावा दोन्ही पक्ष सोडण्यास तयार नव्हते. त्यावर तोडगा निघाला त्यानंतरच युतीचा मार्ग मोकळा झाला. बडनेऱ्याच्या जागेचा घोळही कायम होता. तिथे रवी राणा भाजपच्या तिकिटावर निवडणूक करायच्या तयारीत होते. पण जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे गेल्याने राणांची पंचाईत झाली आहे. ते पुन्हा राष्ट्रावादीच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे.

---------------------------------------------------------------

VIDEO : अखेर आदित्य ठाकरेंनीच केली निवडणूक लढवण्याबद्दल घोषणा, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 30, 2019 08:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...