सत्तास्थापनेचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार? अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतरच येणार नवं सरकार

सत्तास्थापनेचा 31 ऑक्टोबरचा मुहूर्त टळणार? अमित शहांच्या मुंबई दौऱ्यानंतरच येणार नवं सरकार

1 किंवा 2 नोव्हेंबरला अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्यानंतरच महायुतीच्या वाटाघाटी ठरतील. भाजप पक्षाध्यक्ष शहा यांच्या भेटीअगोदर युतीचं सत्तावाटपचं सूत्र ठरणं आवश्यक आहे. पडद्यामागे नेमकं काय चाललंय?

  • Share this:

विवेक कुलकर्णी

मुंबई, 29 ऑक्टोबर : शिवसेना भाजपमधल्या सत्तावाटपाच्या फॉर्म्युल्याची चर्चा अद्याप संपलेली नाही. त्यात दोन्ही पक्षांतले नेते वेगवेगळी, परस्पर विरोधातली वक्तव्य करत असल्याने वाद चिघळत आहे. त्यातच आज म्हणजे मंगळवारी होणारी पहिली बैठक रद्द झाली. 5 वर्षं मीच मुख्यमंत्री होणार या मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर सेना नेते खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी बोलताना बैठक रद्द झाल्याची माहिती दिली. आता ही चर्चा लवकर पूर्ण होण्याची शक्यता नाही. त्यामुळे 31 तारखेला नवीन सरकारचा शपथविधी होणार ही आधीची शक्यता आता गेल्यात जमा आहे. 1 किंवा 2 नोव्हेंबरला अमित शहा मुंबईत येणार आहेत. त्यानंतरच महायुतीच्या वाटाघाटी ठरतील. भाजप पक्षाध्यक्ष शहा यांच्या भेटीअगोदर युतीचं सत्तावाटपचं सूत्र ठरणं आवश्यक आहे. तरच पुढचा मार्ग मोकळा होईल. भाजप- शिवसेनेदरम्यानची ही चर्चा कधीपर्यंत चालणार हे निश्चित नाही.

सत्तावाटपावरून भाजप आणि शिवसेनेत मतभेद निर्माण झाले आहेत. अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेणार असं काही माझ्या समोर ठरलं नव्हतं असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्यानंतर शिवसेना आक्रमक झालीय.

वाचा - मुख्यमंत्रिपदाबद्दल मोठी बातमी, अडीच-अडीच वर्षांची चर्चा फडणवीसांच्या अनुपस्थिती

लोकसभच्या वेळी जर काहीच फॉर्म्युला ठरला नव्हता तर चर्चा काय करायची अशी भूमिका घेत शिवसेनेने आज होणारी दोन्ही पक्षांची बैठक रद्द केल्याची माहिती शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी दिलीय. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे भाजपवरचा दबाव वाढणार आहे. सत्तावाटपाचं काहीच ठरलं नव्हतं असं जर मुख्यमंत्री म्हणत असतील तर असे मुख्यमंत्री महाराष्ट्राला लखलाभ असो असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावलाय.

संबंधित वृत्त - भाजप-शिवसेनेत मतभेद, सत्तावाटपाची पहिलीच बैठक रद्द

राऊत म्हणाले, दोन्ही पक्षांचे दोन दोन नेते आज प्राथमिक चर्चेला बसणार होते. मात्र मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना पक्षप्रमुखांनी उद्धव ठाकरे यांनी ही बैठक रद्द केल्याचं संजय राऊत यांनी सांगितलंय.

9 नोव्हेंबर डेडलाईन

नवीन सरकार 9 नोव्हेंबरच्या आत स्थापन होणं आवश्यक आहे. कारण या सरकारची मुदत 8 नोव्हेंबरला संपते आहे.

वाचा - शिवसेनेची झोप उडवणारी बातमी; 56 पैकी 45 आमदार भाजपच्या संपर्कात!

महायुतीला संपूर्ण बहुमत मिळूनसुद्धा अद्याप मुख्यमंत्रिपदाचा फॉर्म्युला ठरला नसल्यामुळे सरकार स्थापनेला उशीर होत आहे. पण कुठल्याही परिस्थितीत जुन्या सरकारची मुदत संपण्याआधी निर्णय होणं आवश्यक आहे.

विधीमंडळ नेतानिवड बुधवारी

दरम्यान भाजपच्या विधीमंडळ नेतानिवडीसाठीची बैठक उद्या म्हणजे बुधवारी होणार आहे. विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड होण्याची शक्यता आहे.

----------------------------------

'ठरलं ते झालं नाही तर...',युतीसंदर्भात संजय राऊत यांचं मोठं विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 29, 2019 04:47 PM IST

ताज्या बातम्या