आसामच्या धर्तीवर मुंबईतही 'NRC' लागू करा, शिवसेनेच्या या नेत्याची मागणी

आसामच्या धर्तीवर मुंबईतही 'NRC' लागू करा, शिवसेनेच्या या नेत्याची मागणी

मुंबईतील अवैध बांगलादेशींचा प्रश्नही सुटायला हवा. यासाठी आसामच्या धर्तीवर मुंबईतही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

  • Share this:

मुंबई, 1 सप्टेंबर: मुंबईतील अवैध बांगलादेशींचा प्रश्नही सुटायला हवा. यासाठी आसामच्या धर्तीवर मुंबईतही राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) लागू करावी, अशी मागणी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी केली आहे.

आसाममधील मूळ रहिवाशांचे प्रश्न सोडवण्यासाठी एनआरसीच्या अंमलबजावणीची आवश्यक होती. बांगलादेशातून होणाऱ्या घुसखोरीचा मुद्दा सर्वप्रथम शिवसेनेने संसदेत मांडला होता. आसाममधील 'एनआरसी'ला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. त्यामुळे आता मुंबईमध्येही नोंदणी करण्यात यावी, असे अरविंद सावंत यांनी म्हटले. बांगलादेशी आणि रोहिंग्या यांच्या बेकायदेशीर घुसखोरीमुळे अनेक समस्या निर्माण होतात. याच लोकांचा गुन्ह्यांमध्ये हात असल्याने दिल्लीसारखे शहरही धोकादायक बनले आहे. यासंदर्भात ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपप्रमुख मनोज तिवारी यांची भेट घेणार असल्याचे अरविंद सावंत यांनी सांगितले.

दरम्यान, आसामममध्ये शनिवारी (31 ऑगस्ट) एनआरसीची अखेरची यादी जाहीर झाली. अखेरच्या यादीत 3 कोटी 11 लाख 21 हजार 4 जणांची नावे आहेत. तर 19 लाख 6 हजार 657 जणांची नावे या यादीत नाहीत. या नागरिकांकडे आधार कार्ड तसेच मतदानपत्र नसल्याचेही सिद्ध झाले आहे. यादीत नावे नाहीत असे नागरिक परदेशी लवादाकडे अपील करू शकतात. सध्या ज्यांची नावे यादीत नाहीत त्यांच्या सर्व सरकारी सुविधा आणि लाभ तातडीने रद्द करण्यात आले आहेत.

VIDEO: राजू शेट्टींवर टीका करताना सदाभाऊ खोत यांचा तोल सुटला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Sep 1, 2019 03:56 PM IST

ताज्या बातम्या