भाजपने शिवसेना व आरपीआयला डावललं, भुसावळात कार्यकर्ते नाराज

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा एकाही बॅनरवर फोटो नसल्याने शिवसेनेसह आरपीआय कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 01:31 PM IST

भाजपने शिवसेना व आरपीआयला डावललं, भुसावळात कार्यकर्ते नाराज

इम्तियाज अहमद, (प्रतिनिधी)

भुसावळ, 23 ऑगस्ट- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा शु्क्रवारी, 23 रोजी जळगाव जिल्ह्यात येत आहे. यात त्यांच्या जळगावसह भुसावळ व जामनेर अशा तीन ठिकाणी मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र, भुसावळ येथे शिवसेना आणि आरपीआयचे कार्यकर्ते भाजपवर नाराज झाले आहेत. महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी जय्यत तयारी झाली आहे. शहरात मोठ्याप्रमाणात स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहे. शिवसेना आणि आरपीआय युती असूनही शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले यांचा एकाही बॅनरवर फोटो नसल्याने शिवसेनेसह आरपीआय कार्यकर्ते नाराज झाले आहेत.

आरपीआयने लावले पक्षाचे झेंडे..

आरपीआयच्या माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मीताई मकासरे यांनी यावलवरील महात्मा गांधी पुतळ्याजवळ आपल्या पक्षाचे झेंडे लावले आहे. आरपीआय हा युतीचा घटक पक्ष आहे. राज्यात युतीची सत्ता असतानाही भुसावळ शहरात भाजपने महाजनादेश यात्रेच्या स्वागतासाठी लावलेल्या बॅनरवर शिवसेना आणि आरपीआयच्या नेत्यांचे फोटो नाही. त्यामुळे भाजपकडून शिवसेना आणि आरपीआयला डावलण्यात आल्याने कार्यकर्ते नाराज झाले आहेत. आगामी विधानसभेत 'युती' होणार की नाही असा संभ्रमही कार्यकर्त्यांमध्ये निर्माण झाला आहे.

जळगावमध्ये मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न

Loading...

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ईडीकडून चौकशी झाल्यानंतर राज्यभरात मनसेचे कार्यकर्ते सरकारविरोधात आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनसेच्या विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष विनोद शिंदे यांच्यासह चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा जळगावात पोहोचल्यानंतर त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येतील, असा इशारा मनसेने दिला होता. पण, पोलिसांनी त्याआधीच मनसे कार्यकर्त्यांवर कारवाई करत त्यांना ताब्यात घेतले आहे.

मनसेविरुद्ध सरकार संघर्ष पेटणार

कोहिनूर मिलप्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुरुवारी ईडी कार्यालयात 8 तास चौकशी करण्यात आली.मात्र त्त्यानंतरही राज ठाकरे यांचा आक्रमक अंदाज कायम असल्याचं पाहायला मिळालं. कृष्णकुंजवर पोहोचल्यानंतर कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं. यावेळी राज ठाकरे म्हणाले की, 'अशी कितीही वेळा चौकशी केली तरी माझं तोंड बंद होणार नाही.' राज ठाकरे यांच्या या प्रतिक्रियेनंतर मनसे कार्यकर्त्यांमध्ये पुन्हा उत्साह संचारल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे आगामी काळातही याच मुद्द्यावर मनसैनिक सरकारविरोधात आक्रमक होण्याची शक्यता आहे.

VIDEO: 'काँग्रेसच्या भ्रष्टाचाराची जत्रा झाल्यानं यात्रा रद्द झाली', मुख्यमंत्र्यांचा हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: shiv sena
First Published: Aug 23, 2019 01:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...