मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /जालन्यात पुन्हा दानवे-खोतकर आमनेसामने, सेनेच्या बॅनरमुळे वातावरण तापले

जालन्यात पुन्हा दानवे-खोतकर आमनेसामने, सेनेच्या बॅनरमुळे वातावरण तापले

 या बॅनरमध्ये खोतकरांचा उल्लेख 'भावी खासदार' असा करण्यात आला असून 'भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है'

या बॅनरमध्ये खोतकरांचा उल्लेख 'भावी खासदार' असा करण्यात आला असून 'भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है'

या बॅनरमध्ये खोतकरांचा उल्लेख 'भावी खासदार' असा करण्यात आला असून 'भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है'

जालना, 11 डिसेंबर : जालन्यात (jalana) शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर (arjun khotkar) यांची ईडीने चौकशी केल्यामुळे वातावरण ढवळून निघाले आहे. अशातच युवासैनिकांनी अर्जुन खोतकरांचा भावी खासदार म्हणून उल्लेख असलेले बॅनर लावून एकच धुरळा उडवून दिला आहे. त्यामुळे भाजपचे खासदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे (raosaheb danve) विरुद्ध अर्जुन खोतकर यांच्यात बॅनर वॉर चिघळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

एकेकाळचे मित्रपक्ष असलेल्या शिवसेना-भाजपात ज्याप्रमाणे राज्यस्तरावर टोकाचा बेबनाव सुरू आहे तसाच किंबहुना त्यापेक्षा अधिकचा संघर्ष सध्या जालन्यात भाजपचे खासदार तथा केंद्रीय रेल्वे, खाण व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्यात पाहायला मिळतोय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पूर्वीच खोतकर-दानवे यांच्यात वादाची ठिणगी पेटली होती.

सेना-भाजप युती असून देखील खोतकरांनी बंड पुकारत दानवे विरोधात लोकसभा निवडणुक लढविण्याची घोषणा केली होती. ज्यामुळे फक्त स्थानिकच नव्हे तर राज्यस्तरावर देखील राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. परंतु, थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत खोतकर-दानवे यांच्यात मनोमिलन घडवून खोतकरांचा बंड थंड केला होता. यांनतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत दानवेंचा विजय झाला तर विधानसभा निवडणुकीत खोतकरांचा पराभव झाला होता. खोतकर यांच्या पराभवामागे अप्रत्यक्षरीत्या दानवेंचाच हात असल्याचे दबक्या आवाजात बोलले जात होते.

ठाण्यात वडापाव सेंटरमध्ये गॅस गळती; सिलिंडरने पेट घेतल्याने महिला गंभीर जखमी

दरम्यान, काही दिवसांपूर्वी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन रामनगर साखर कारखान्याच्या माध्यमातून खोतकरांनी 100 कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. दरम्यान, यानंतर काही दिवसातच अर्जुन खोटकरांवर ED चे छापे पडले होते. या कारवाईमागे देखील दानवे यांचाच हात असल्याचा आरोप खोतकर यांनी केला होता. यांनातर खोतकर-दानवे यांच्यात आरोप-प्रत्यारोपचा राजकीय कलगीतुरा सुरू झाला होता. दरम्यान, खोतकर-दानवे यांच्यातील वाद आता कुठेतरी शमत असताना जालन्यात एका युवासैनिकाने लावलेल्या बॅनरमुळे खोतकर-दानवे यांच्यातील वाद पुन्हा चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

चिमुकली खेळत असतानाच अचानक समोर आला भलामोठा अजगर अन्...; धडकी भरवणारा VIDEO

या बॅनरमध्ये खोतकरांचा उल्लेख 'भावी खासदार' असा करण्यात आला असून 'भाऊ तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है', म्हणत लोकसभा निवडणुकीत खोतकर-दानवे राजकीय घमासान पाहायला मिळेल याचे संकेत देण्यात आले.

भाजप खासदार दानवे यांनी जालन्याचा काहीच विकास केला नसून सूडबुद्धीने राजकीय द्वेषातून खोटे आरोप करून खोतकरांना नाहक बदनाम केलं जात आहे. खोतकर हे सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन चालणारे नेते असून सर्व शिवसैनिक तनमन धनाने त्यांना खासदार बनवणार असल्याचा निर्धार युवासेना शहर प्रमुख योगेश रत्नपारखे यांनी बोलून दाखवला.

तर दुसरीकडे, ही बॅनरबाजी आगामी नगर पालिका निवडणुकीत तिकीट मिळवण्यासाठीचा केविलवाणा प्रयत्न आहे. दानवे हे 5 टर्म खासदार असून त्यांनी हजारो कोटींची विकासकामे करून जालन्याचा चेहरामोहरा बदलून टाकलाय. आगामी निवडणुकीत देखील दानवे 5 लाखांच्या मताधिक्याने विजयी होऊन डबल हॅट्रिक पूर्ण करतील असा विश्वास भाजप कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.

First published:
top videos