शिरुर लोकसभा निवडणूक : शिवाजीराव आढळराव VS अमोल कोल्हे

शिरुर लोकसभा निवडणूक : शिवाजीराव आढळराव VS अमोल कोल्हे

लोकसभेच्या यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेची मदार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावरच आहे. शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत आहे.

  • Share this:

शिरुर, 13 मे : लोकसभेच्या यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेची मदार विद्यमान खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यावरच आहे. शिवाजीराव आढळराव याआधी 3 वेळा खासदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसने डॉ. अमोल कोल्हेंना उमेदवारी दिली. त्यामुळे या दोघांमध्ये थेट लढत आहे.

शिवसेनेची हॅटट्रिक होणार का?

शिरुर हा लोकसभा मतदारसंघ 2008 मध्ये अस्तित्वात आला. त्यानंतर 2009 आणि 2014 च्या निवडणुकीत शिवसेनेने विजय मिळवला. त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसेना शिरुरचा गड राखणार का? याची चर्चा आहे.2014 च्या निवडणुकीत मोदी लाट होती. शिवसेनेने याही वेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांना तिकीट दिलं. त्यावेळी शिवाजीराव आढळराव पाटील यांनी जोरदार मताधिक्य मिळवत राष्ट्रवादीचे देवदत्त निकम यांचा पराभव केला. 2009 मध्येही शिवाजीराव आढळराव पाटील यांना 4 लाख 82 हजार 563 मतं मिळाली होती. त्यांनी राष्ट्रवादीच्या विलास लांडे यांचा पराभव केला होता. 2004 पासून खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव आपली यशस्वी कारकीर्द सुरूच ठेवणार का? हा प्रश्न विचारला जात आहे.

राष्ट्रवादीचाही जोर

स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेमुळे लोकप्रिय असलेले कलाकार डॉ.अमोल कोल्हे यांनाही इथे मतदारांचा चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. आधी शिवसेनेत असणाऱ्या अमोल कोल्हेंनी निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यांच्या लोकप्रियतेचा राष्ट्रवादीला किती फायदा मिळणार हे निकालाच्या दिवशीच कळेल.

वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व

शिरुर लोकसभा मतदारसंघात खेड, आळंदी, शिरुर, भोसरी, हडपसर, आंबेगाव आणि जुन्नर या विधानसभेच्या जागांवर वेगवेगळ्या पक्षांचं वर्चस्व आहे. या सगळ्या जागांवर राष्ट्रवादीनेही चांगलाच जोर लावला होता.

जुन्नर विधानसभा मतदारसंघात मनसे, आंबेगावमध्ये राष्ट्रवादी तर खेड आणि आळंदीच्या जागा शिवसेनेकडे आहेत. शिरुर आणि हडपसर भाजपकडे आहे आणि भोसरीमध्ये अपक्ष आमदार आहेत.

=================================================================================

VIDEO : राज ठाकरेंनी मराठा वैद्यकीय विद्यार्थ्यांना दिला 'हा' सल्ला

First published: May 13, 2019, 7:32 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading